संघ पराभूत झाला, परंतु तो अखेरपर्यंत लढला!

मुंबई | किंग्ज ११ पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बुधवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने ३ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ६० चेंडूत ९४ धावा करणाऱ्या केएल राहुलची मात्र चांगलीच निराशा झाली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने २० षटाकांत ८ बाद १८६ धावा केल्या. त्यात पोलार्ड ५० तर कृणाल पंड्या ३२ यांच्या धावांचा समावेश होता. त्यानंतर पंजाबकडून केएल राहुलने ९४ तर अॅराॅन फिंचने ४६ धावा केल्या.

संघाला जिंकायला ९ चेंडूत १६ धावा लागत असताना राहुल बाद झाला.त्यानंतर शेवटचे काही चेंडू बाकी असताना युवराज सिंगला विशेष काही करता न आल्यामुळे पंजाबला ३ धावांनी पराभवला सामोरे जावे लागले.

या सामन्यात ९४ धावा करणाऱ्या राहुलने अनेक विक्रम केले. ते असे- 

-या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल (३२) षटकारांसह अव्वल

-राहुलने आयपीएलच्या या हंगामात ६५२ धावा केल्या असुन किंग्ज ११ पंजाबकडून केलेल्या एका हंगामातील या सर्वोच्च धावा आहेत. यापुर्वी शाॅन मार्शने २००८मध्ये ६१६ धावा केल्या होत्या.

-धावांचा अयशस्वी पाठलाग करताना राहुलने एकदा नाबाद ९५ तर काल ९४ धावा याच मोसमात केल्या आहेत.

-धावांचा पाठलाग करताना केएल राहुलने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा (४८२) करण्याचा विक्रम केला आहे. २०१६मध्ये धावांचा पाठलाग करताना डेविड वार्नरने ४६८ धावा केल्या होत्या.

-आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूने एका हंगामात ३० पेक्षा जास्त षटकार मारण्याची तिसरीच वेळ. यापुर्वी विराट कोहलीने २०१६ला ३८ तर रिषभ पंतने याच हंगामात ३१ षटकार मारले आहेत. सध्या केएल राहुलच्या नावावर ३२ षटकार आहेत.