फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग!

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून किर्तीमान मिळवलेल्या महेंद्र सिंग धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दित यशाची अनेक शिखरे सर केली आहेत.

एक खेळाडू म्हणून त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक चढ-उतार पाहिलेत. त्याच्या खेळात वेळोवेळी परिस्थितीनुसार बदलही झाला आहे. पण त्याची शारीरिक तंदुरूस्ती मात्र त्याने 2004 मध्ये पदार्पण केले होते तेव्हा जशी होती तशीच आता आहे.

त्यांची यष्टीरक्षणातील चपळता आणि धावा काढण्याचा वेग पहिल्या सारखा नव्हे, तर वेळेबरोबर आणखी चांगला होत गेला आहे.

36 वर्षीय धोनीने त्याची शारीरिक तंदुरूस्ती ठेवण्यासाठी त्याच्या आवडत्या बटर चिकन या पदार्थाचा त्याला त्याग करावा लागला आहे.

याचा उलगडा धोनीने स्वता: मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात केला.

” जर तुम्हाला तुमच्यात बदल घडवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. त्याच त्या गोष्टी करून तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. मी 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केल्यानंतर शारीरिक तंदुरूस्ती राखण्यासाठी माझ्या खाण्याच्या सवयीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले.” असे भारताला दोन विश्वचषक जिंकुन देणारा कर्णधार म्हणाला.

“पूर्वी मी बटर चीकन, नान, चॉकलेट आणि दूध यांचा मोठ्या प्रमाणात माझ्या आहारात समावेश असायचा. तो मी 2004 नंतर पूर्णपणे बंद केला. त्याच्या जागी शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी पौष्टीक पदार्थ खाण्यावर भर देतोय.” असेही तो म्हणाला.

आपण जर धोनीचे ट्विटर अकाऊंट पाहिले तर त्याच्या बायोमध्ये देखील त्याने बटर चिकन लव्हर असे लिहिले आहे. ते आजही तसेच असले तरी त्याने ते खाने मात्र सोडले आहे.

“मी आयपीयल दरम्यान जीम बंद केली होती. जीम एैवजी रोईंग मशिनवर  मी व्यायम करायचो. सकाळी उठल्यानंतर मी माझा नाश्ता ऑर्डर करायचो आणि नाश्ता येइपर्यंत रूममधेच रोईंग मशिनवर व्यायाम करायचो.” असेही तो आय़पीएलमधील त्याच्या व्यायामाबद्दल बोलताना म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटरने मोडला स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम