आजचा सामन्यात बेंगलोर जर पराभूत झाले तर….

बेंगलुरु | आज गुरुवारी राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात बेंगलोरला विजय मिळवणे अनिवार्य आहे. आज जर ते या सामन्यात पराभूत झाले तर त्यांचे या स्पर्धेतून जवळपास बाहेर गेल्यात जमा आहे.

सध्या बेंगलोरचे आयपीएलमध्ये १२ सामन्यात १० गुण आहेत. त्यांना राहिलेले दोन्ही सामने हे फक्त जिंकायचे नसुन ते मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

काल मुंबई इंडियन्सने पंजाबवर मिळवल्यामुळे बेंगलोरचे स्पर्धेतील आव्हान टिकुन राहिले आहे. हैद्राबाद १२ सामन्यात १८ गुणांसह गुणातालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यांनी आजच्या सामन्यात विजय मिळवला तर ते साखळी फेरीत अव्वल स्थानी कायम रहाण्याची संधी जास्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेवटचा सामना जिंकुनही मुंबई होऊ शकते आयपीएलमधून बाहेर

महिलांच्या ऐतिहासिक आयपीएल टी२०साठी संघांची घोषणा

9 दिवसांत केएल राहुलच्या नावावर झाले दोन नकोसे विक्रम

संघ पराभूत झाला, परंतु तो अखेरपर्यंत लढला!

आणि पंड्या-राहुलने केली जर्सीची अदलाबदली, चाहते भावुक!