५० कसोटी खेळलेला पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू करतोय पुनरागमन

पाकिस्तानचा आॅस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला कसोटी सामना 7 आॅक्टोबरपासून दुबईत होणार असून त्यासाठी पाकिस्तानच्या संघात एक बदल करण्यात आला आहे.

पाकिस्तानने आधीच्या संघात 37 वर्षीय मोहम्मद हाफीजला स्थान दिले आहे. भारताकडून दोनदा आणि बांगलादेशाकडूनही एकदा पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानच्या संघ निवड समितीने अनुभवी मोहम्मद हाफीजला संघात स्थान दिले आहे.

एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला अंतिम सामन्यात पोहचण्यात अपयश आले होते. त्यानंतर भारताने बांगलादेशाचा अंतिम सामन्यात पराभव एशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे पाकिस्तीनी चाहते या संघावर नाराज झाले आहेत. त्यानंतर लगेच आॅस्ट्रेलियाविरूद्ध संघ व्यवस्थापन कोणत्याही प्रकारचे नुकसान करून घेण्यास तयार नाही.

हाफीजने आपला शेवटचा कसोटी सामना 2016 मध्ये इंग्लडविरूद्ध खेळला होता. त्याने मागच्या आठवड्यात घरगुती सामन्यात द्विशतक केले होते. त्यामुळे निवड समितीचे लक्ष त्याच्यावर होते.

आॅस्ट्रेलियाविरूद्ध पाकिस्तानचा संघ-

सरफराज अहमद (कर्णधार), अझहर अली, फखर जमन, इमाम-उल-हक, बाबर आझम, असद शफीक, हरिस सोहेल, उस्मान सलाउद्दीन, यासिर शाह, शादाब खान, बिलाल असिफ, मोहम्मद अब्बास, हसन अली, वहाब रियाज, फहीम अशरफ, मीर हमझा, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हफीज

महत्त्वाच्या बातम्या-

-२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ

-रोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला!

-विराटला बाद करण्याचा मंत्र सापडला- वकार युनुस