भारताकडून २९० खेळाडू कसोटी खेळले, परंतु अशी कामगिरी करणारा अश्विन एकटाच

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत.

या सामन्यात इंग्लंडला रोखण्यात फिरकी गोलंदाज आर अश्विनने मोठी भूमिका बजावली. त्याने २७ षटकांत ७ षटके निर्धाव टाकत ४ विकेट्स घेतल्या.

याबरोबर त्याने एक खास विक्रमही केला. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशीच ४ विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.

आशिया खंडाबाहेर भारतीय फिरकी गोलंदाजांनी पहिल्या दिवशी केलेली सर्वोत्तम कामगिरी-

६-९४ भागवत चंद्रशेखर विरुद्ध न्युझीलंड, १९७६

५-५५ बिशनसिंग बेदी विरुद्ध आॅस्ट्रेलिया, १९७७

५-८४ अनिल कुंबळे विरुद्ध आॅस्ट्रेलिया, २००७

४-६० आर अश्विन विरुद्ध इंग्लंड, २०१८

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम

भज्जीच्या या दोन फोटोमध्ये काय आहे नक्की फरक?

पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम