कोहलीबरोबरच फोटो काढत १४३ वनडे खेळलेल्या खेळाडूने केले स्वत:लाच ट्रोल

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (९ ऑगस्ट) लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.

या सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी (८ ऑगस्ट) पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाककिस्तानचा गोलंदाजीचा प्रशिक्षक असेलेल्या अजहर मेहमूदने ट्विटरवर भारताचा कर्णधार विराट कोहली सोबतचा फोटो शेअर करत स्वत:लाच ट्रोल केले आहे.

“तुला पाहून मला  कायमच आनंद होतो. तू माझ्यासारख्या अनेक जेष्ठ आणि युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा आहेस.” असे मेहमूद आपल्या ट्विटमध्ये म्हणाला.

विराटच्या कामगिरीमुळे प्रभावित होत, मेहमूदने विराटसारखा युवा खेळाडूही जेष्ठांसांठी प्रेरणादायी होऊ शकतो असे आपल्या ट्विटमधून सूचित केले आहे.

अझहर मेहमूदने १९९७ ते २००७ या कालावधीत पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रततिनिधीत्व केले आहे.

त्याने २१ कसोटी सामन्यात ९०० धावा आणि ३९ बळी मिळवले आहेत. तर १४३ सामन्यात १५२१ धावा आणि १२३ बळी मिळवले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-पहिल्यांदा विश्वचषक जिंकल्यावर करुणानिधींनी चेस सेट भेट दिला होता- विश्वनाथन आनंद

-पॉल पोग्बा मॅंचेस्टर युनायटेड सोडून या संघाकडे जाणार