बेन स्टोक्सने मला जीवे मारले असते

ब्रिस्टल | गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंड आणि विंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिके दरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने दारुच्या नशेत दोन व्यक्तींना बेदम  मारहाण केली होती.

या प्रकरणाची सोमवारी (५ ऑगस्ट) ब्रिस्टल न्यायालयात सुनावनी सुरु झाली आहे. या प्रकरणाची गुरुवारी (9 ऑगस्ट) सलग चौथ्या दिवशी सुनावनी झाली.

बेन स्टोक्सने ज्या दोन व्यक्तिंना मारहाण केली होती त्यातील रेयान हेल यांची बाजू काल न्यायालयाने ऐकून घेतली.

“ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी कसाबसा बेन स्टोक्सच्या तावडीतून सुटलो, नाहीतर त्याने मला जीवे मारले असते.” असे आपली बाजू मांडताना रेयान हेल म्हणाले.

हे प्रकरण बेन स्टोक्सला चांगलेच भोवले आहे. यापूर्वी स्टोक्सला अॅशेस मालिकेसाठी मुकावे लागले होते.

तसेच सध्या सुरु असलेल्या भारत-इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला  न्यायालयाच्या सुनावनीमुळे स्टोक्सला मुकावे लागले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-आशियाई स्पर्धा २०१८ साठी श्रीलंका कबड्डी संघाचे पुरुष व महिला कबड्डी संघ जाहीर

-विश्वचषकाच्या फायनलची खेळपट्टी बनवणाऱ्या ग्राउंड्समनचा निरोप सभारंभ हुकला