२०००सालापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ६ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू रंगाना हेराथ सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेटला अलविदा करणार आहे. १९९९ साली ज्या मैदानावर कसोटी पदार्पण केले त्याच मैदानावर तो शेवटचा सामना खेळत आहे.

याबरोबर जागतिक क्रिकेटमधून २००० पुर्वी पदार्पण केलेला एक दिग्गज खेळाडू क्रिकेटला अलविदा करणार आहे.

सध्या हेराथसह २०००पुर्वी पदार्पण केलेले ६ खेळाडू आहेत ज्यांनी अजूनही निवृत्ती घेतली नाही.

यात सर्वात आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण हे हरभजन सिंगचे झाले आहे. हरभजन सिंगचे पदार्पण २५ मार्च १९९८ रोजी ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध झाले आहे.

हरभजन सिंगला मार्च २०१६ नंतर राष्ट्रीय संघात कोणत्याच प्रकारात स्थान देण्यात आले नाही.

युवराज सिंग जून २०१७मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला आहे. त्याने ३ आॅक्टोबर २००० रोजी वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

शोएब मलिक सध्या पाकिस्तानच्या वनडे आणि टी२० संघाचा पूर्णवेळ सदस्य आहे. त्याने १४ आॅक्टोबर २००० रोजी वनडेतून आंतरारष्ट्रीय पदार्पण केले होते.

४ आॅक्टोबर २००० रोजी वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा मार्लन सॅम्युएल सध्या विंडीजच्या वनडे संघात आहे. तो शेवटचा सामना १ नोव्हेंबर २०१८ रोजी भारताविरुद्ध खेळला आहे.

ख्रिस गेलने अ दर्जाच्या क्रिकेटमधून काही दिवसांपुर्वीच निवृत्ती घेतली आहे. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये खूपच कमी खेळताना दिसतो. त्यामुळे त्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यात पहाणे अवघडच आहे. त्याने ११ सप्टेंबर १९९९ भारताविरुद्ध टोरंटोला वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

अन्य खेळाडू ज्यांनी या काळात पदार्पण केले-
हरभजन सिंग- २५ मार्च १९९८
ख्रिस गेल- ११ सप्टेंबर १९९९
रंगाना हेराथ- २२ सप्टेंबर १९९९
शोएब मालिक -१४ ऑक्टोबर १९९९
युवराज सिंग- ०३ ऑक्टोबर २०००
मार्लन सॅम्युएल- ०४ ऑक्टोबर २०००

महत्त्वाच्या बातम्या:

५ वर्षांपुर्वी हाच दिवस होता सचिन- रोहितसाठी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण

आणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट

कसोटी क्रिकेटमध्ये आज इतिहास घडला, रंगना हेराथचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याचा अजिंक्य रहाणेने व्यक्त केला विश्वास

धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी

एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट

बर्थडेच्या दिवशीच पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम