विराट नव्हे २०१८ मध्ये वन-डेत रोहितनेच भाव खाल्लायं

भारत विरुद्ध विंडीज वन-डे मालिका १ नोव्हेंबर रोजी संपली. या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला.

भारताचा १ नोव्हेंबर रोजी झालेला वन-डे सामना हा यावर्षातील शेवटचा वन-डे सामना होता. त्यामुळे यावर्षी कोणत्या खेळाडूने वन-डेत चमकदार कामगिरी केली कोणत्याने नाही याची संपुर्ण आकडेवारी समोर आली आहे.

यात वन-डेत जरी विराटने रोहित शर्मापेक्षा जास्त धावा केल्या असल्या तरी संघाला विजय मिळवुन देण्यात रोहितच विराटच्या पुढे आहे. रोहितने विराटपेक्षा काही सामने जास्त खेळले हाही मुद्दा त्यात महत्त्वाचा आहे.

यावर्षी काय राहिली विराट- रोहितची कामगिरी- 

यावर्षी वन-डेत रोहित शर्माने १९ सामन्यात खेळताना ७३.५७च्या सरासरीने १०३० धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीने यावर्षी १४ सामन्यात १३३.५५च्या सरासरीने १२०२ धावा केल्या आहेत.

जिंकलेल्या सामन्यात दोघेही समान- 

भारताने यावर्षी १४ वनडे सामने जिंकले. यातील सर्व सामन्यात रोहित शर्मा खेळला. त्यात त्याने ११०.६६च्या सरासरीने ९९६ धावा केल्या तर विराटने या १४ पैकी ९ सामन्यात भाग घेतला. यात त्याने १४९.४० च्या सरासरीने ७४७ धावा केल्या.

शतकं आणि अर्धशतकं- 

विराटने पुण्यात केलेली शतकी खेळी व्यर्थ गेली तसेच दोन वेळा अर्धशतकी खेळी केली असताना संघाचा पराभव झाला तर रोहितने यावर्षी जी ५ शतके आणि ३ अर्धशतके केली त्यातील एकाही सामन्यात भारताचा पराभव झाला नाही.

जर रोहित खेळला असता तर- 

भारतीय संघाने यावर्षी वन-डेत ४ पराभव पाहिले. यात रोहितने ७.५०च्या सरासरीने ३० धावा केल्या. पराभूत झालेल्या ४ पैकी ४ सामन्यात विराट कोहलीही खेळला. त्यात विराटने ७४.५०च्या सरासरीने २९८ धावा केल्या. विराटची सरासरी जरी तो किती सातत्यपुर्ण खेळतोय हे दर्शवत असेल तरी रोहितची सरासरी मात्र वेगळीच गोष्ट सांगत आहे. जर रोहित खेळला नाही तर २०१८मध्ये भारताचा हमखास पराभव झाला आहे हे यावरुन स्पष्ट होते.

टाय सामन्यातील कामगिरी- 

यावर्षी भारतीय संघाचे चक्क दोन सामने टाय झाले. यातील एका टाय सामन्यात विराटने १५७ धावांची खेळी केली तर रोहितने केवळ ४ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियासोबतचे ते प्रकरण सायमंड्सला चांगलेच भोवले… झाला व्यसनी

ISL 2018: चेन्नईला पहिल्या विजयाची आशा

Video: जेव्हा धोनीच्या मस्करीमुळे घाबरतो ‘हिटमॅन’ रोहित शर्मा

जम्मू-काश्मिरच्या या गोलंदाजाची कमाल, घेतल्या ४ चेंडूत ४ विकेट्स