विश्व एकादश संघ आज लढणार विश्वविजेत्या विंडीजशी

टी-२० विश्वविजेते विंडीज आणि विश्व एकादश संघामध्ये आज इंग्लंडमधील लाँर्ड्स मैदानावर सामना होत आहे. विंडीजमधील क्रिकेट स्टेडियमच्या दुरूस्तीसाठी निधी गोळा करण्यासाठी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनो हा सामना आयोजित केला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमधे हरीकेन इम्रा आणि हरीकेन मरीया या वादळामळे वेस्टइंडीजमधील क्रिकेट स्टेडीयम्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या सामन्याला आंतराष्ट्रीय क्रिकेट समितीने आंतराष्ट्रीय सामन्याचा दर्जा दिला आहे.

विंडीज संघाचे कर्णधारपद कार्लोस ब्रेथवेट भूषवणार आहे. तर, नुकतेच आयपीएल गाजवलेले ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणी इविन लुईस यांचाही या विंडीज संघामधे समावेश आहे.

विश्व एकादश संघाचे नेतृत्व पाकीस्तानचा शाहिद आफ्रीदी करणार आहे. विश्व एकादश संघामधे रशीद खान, तमीम इक्बाल, शोयेब मलिक तर भारतीय संघातील दिनेश कार्तीक व मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

विंडीज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कँमराँन यांनी हा सामना आयोजित केल्याबद्दल मेरीबोलिन क्रिकेट क्लब आणि इंग्लंड क्रिकेट मंडळाचे आभार मानले.

यापूर्वी १९६६ मधेही विश्व एकादश आणि वेस्टइंडीज संघामधे लाँर्ड्सवर प्रदर्शनीय सामना झाला होता. या सामन्यात वेस्टइंडीज संघाने विश्व एकादश संघावर १८ धावांनी विजय मिळवला होता.

वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या- 

-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली

-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख

-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली

-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली