मिस्टर ३६० एबी डीव्हिलीयर्सचे ते स्वप्न आजही आहे अधुरे

मुंबई | दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डीविलियर्सने आंतरराष्टीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करुन काल बरोबर १ वर्ष झाले. त्याने ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली होती.

एबीने आपल्या विडोओमध्ये तेव्हा असे म्हटले होते की हा खुप कठोर निर्णय होता. आज एबी ज्या संघाचा एकवेळ मुख्य शिलेदार होता तो संघ विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडमध्ये मैदानात उतरेल. परंतु त्या संघाला एबीची कमी नक्कीच सर्वाधिक जाणवेल.

एबी डीविलियर्सने दक्षिण आफ्रिकेडून ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत.

या खेळाडूला वनडेत १०,००० धावा करण्यासाठी केवळ ४२३ धावांची गरज होती. त्याने २२८ वनडेत २५ शतके आणि ५३ अर्धशतके केली आहेत.

आपल्याला २०१९चा विश्वचषक खेळण्यात विशेष रस नसल्याचे त्याने निवृत्तीपुर्वीच सांगितले होते.

वनडेत आजपर्यंत १४ खेळाडूंनी १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस हा एकमेव खेळाडू आहे. तर सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी, विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या नावावर १० हजार धावा आहेत. एबीची मात्र विश्वचषक जिंकण्याची तसेच १० हजार धावा करण्याची संधी मात्र हुकलीच.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीच्या मते हा संघ वनडेमध्ये करेल सर्वप्रथम ५०० धावा

विश्वचषक २०१९: या ५ अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या कामगिरीकडे असेल लक्ष

विश्वचषक २०१९: या कारणामुळे काही सामन्यांसाठी बदलणार टीम इंडियाची जर्सी