संपुर्ण वेळापत्रक: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत अशी रंगणार टी२० मालिका

मुंबई | भारतीय संघाचा २०१८-१९ हंगामातील परदेश दौरा काल न्यूझीलंड विरुद्ध १-२ अशा पराभवाने संपला. हा हंगामातील परदेश दौरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेने जानेवारी २०१८मध्ये सुरु झाला होता.

आता ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येत असून टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ टी२० आणि ५ वनडे सामने खेळणार आहे.

२४ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाबरोबर हे २ टी२० सामने खेळणार आहे. पहिला सामना  विशाखापट्टनम तर दुसरा सामना बेंगलोरला होणार आहे.

त्यानंतर 2 मार्चपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादला होणार आहे. त्यानंतर नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.

Photo Courtesy: Twitter/ ICC

टी20 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. तर वनडे सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील.

ही मालिका दोन्ही संघासाठी मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ

हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?

या मालिकेतील केवळ एकच सामना महाराष्ट्रात होणार आहे. हा मालिकेतील दुसरा सामना असून तो ५ मार्च रोजी नागपुर येथे होणार आहे.

असा असेल ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – 

टी20 मालिका – 

पहिला टी20 सामना – 24 फेब्रुवारी – बंगळूरु – वेळ: संध्या. 7.00 वाजता

दुसरा टी20 सामना – 27 फेब्रुवारी – विशाखापट्टणम – वेळ: संध्या. 7.00 वाजता

वनडे मालिका – 

पहिला वनडे सामना – 2 मार्च – हैद्राबाद – वेळ: दुपारी 1.30 वाजता

दुसरा वनडे सामना – 5 मार्च – नागपूर – वेळ: दुपारी 1.30 वाजता

तिसरा वनडे सामना – 8 मार्च – रांची – वेळ: दुपारी 1.30 वाजता

चौथा वनडे सामना – 10 मार्च – मोहाली – वेळ: दुपारी 1.30 वाजता

पाचवा वनडे सामना – 13 मार्च – दिल्ली – वेळ: दुपारी 1.30 वाजता

महत्त्वाच्या बातम्या- 

काल टीम इंडिया पराभूत झाली, आज कुलदीपला मिळाली ही गुड न्यूज

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके

आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा