पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिस संघाने पटकावले विजेतेपद

पुणे । गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-यानंतर आशय पालकरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इन्फोसिस संघाने प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत सिमन्स संघावर सात गडी राखून मात करून विजेतेपद पटकावले. सिमन्स संघाने दिलेले १२७ धावांचे लक्ष्य इन्फोसिस संघाने १७ षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.

नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. सिमन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इन्फोसिस संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून सिमन्सच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. त्यामुळे सिमन्सची ४ बाद ३२ अशी स्थिती झाली होती. यानंतर विशाल रैनाने एका बाजूने किल्ला लढवून सिमन्सला शतकी टप्पा गाठून दिला. विशालने ५० चेंडूंत २ चौकारांसह ५० धावा केल्या. त्यामुळे सिमन्सला २० षटकांत ८ बाद १२६ धावा फलकावर लावता आल्या.

यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभज्योत मल्होत्रा अवघ्या चार धावांवर माघारी परतला. यानंतर संदीप शांघई आणि साईनाथ शिंदे एकापाठोपाठ बाद झाले. आशय पालकरने गौरव बाबेलच्या साथीने इन्फोसिसला ३ षटके शिल्लक राखून विजय मिळवून दिला. आशय-गौरव जोडीने चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची अभेद्य भागीदारी केली. आशयने ४२ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ६०, तर गौरवने २९ चेंडूंत २ चौकार व १ षटकारसह नाबाद ३५ धावा केल्या.

पारितोषिक वितरण सोहळ्यात आमदार राहुल कुल, स्प्रिंगेर नेचरच्या कॉर्पोरेट हेड निधी गुलाटी, पूना क्लबचे चेअरमन राहुल ढोले पाटील, उद्योजक शशिभाऊ काटे, अभिजीत जाधव, इंडियन बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सौरभ कुमार, माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर, नाना मते, नौशाद शेख, प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे चेअरमन अमित जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उत्कृष्ट फलंदाज संदीप शांघाय, उत्कृष्ट गोलंदाज रवी थाप्लियाल, मालिकावीर विशाल रैना यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक – सिमन्स – २० षटकांत ८ बाद १२६ (विशाल रैना ५०, रोहन पवार १७, सौम्या मोहंती १६, रवी थाप्लियाल २-१७, भास्कर श्रीवास्तव १-२३, सागर दुबे १-१६, अखिल गोपिनाथ १-१७, आशय पालकर १-२१, थॉम्पसन शरॉन १-२४) पराभूत वि. इन्फोसिस – १७ षटकांत ३ बाद १२९ (आशय पालकर नाबाद ६०, गौरव बाबेल नाबाद ३५, संदीप शांघई २२, दीपककुमार १-१५, शुभम झा १-२१, मनोज भागवत १-१५).

महत्त्वाच्या बातम्या- 

काल टीम इंडिया पराभूत झाली, आज कुलदीपला मिळाली ही गुड न्यूज

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके

आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा