विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील २०वे शतक, भारत २ बाद २६८

दिल्ली । भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने मुरली विजयपाठोपाठ शतकी खेळी केली आहे. विराटचे हे कसोटी क्रिकेटमधील २०वे शतक आहे.

शतकी खेळी करताना विराटने ११२ चेंडूत १०२ धावा करताना १४ चौकार मारले आहेत. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५२वे शतक आहे.

सध्यस्थितीत भारतीय संघ ६२.४ षटकांत २ बाद २७१ धावांवर खेळत आहे.