खेळ आकड्यांचा: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत होणार २५ हुन अधिक विश्वविक्रम

चेन्नई । श्रीलंका दौऱ्यात ९-० असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारत आता मायदेशात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. रविवारी १७ सप्टेंबरला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. प्रत्येक भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेप्रमाणेच ही मालिकाही रंगतदार होणार यात काही शंका नाही.

या मालिकेत अनेक विक्रम मोडण्याची आणि नवीन विक्रम बनण्याची शक्यता आहे! असे विक्रम जे क्रिकेटप्रेमींना दीर्घकाळ स्मरणात राहतील-

#१२३ भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान १२३ एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यातील भारताने ४१ सामने भारताने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने ७२ सामने जिंकले आहेत आणि १० सामने अनिर्णित राहिले आहेत . भारतात झालेल्या ५१ सामन्यांपैकी २५ सामने ऑस्ट्रलियाने जिंकले आहेत तर भारताने केवळ २१ सामने जिंकले आहेत आणि पाच सामने अनिर्णित राहिले आहेत.

#१ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एम ए चिदंबरम स्टेडियम चेपॉक, चेन्नई येथे याआधी १ वनडे सामना १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान झाला आहे. या लढतीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाने १ धावेने मात दिली होती.

#१००% ऑस्ट्रेलियाने चेपॉकच्या मैदानावर ४ सामने खेळले आहेत आणि त्यातील ४ ही सामने त्यांनी जिंकले आहेत. या मैदानावर त्यांचा १००% विजयी रेकॉर्ड आहे. भारताने आतापर्यंत या मैदानावरील ११ एकदिवसीय सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत तर ४ सामने गमावले आहेत आणि १ सामना अनिर्णित राहिला आहे.

#११६ भारताने २०१० पासून सर्वाधिक म्हणजेच ११६ वनडे सामने जिंकले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने १०६ सामने जिंकले आहेत.

#११ ऑस्ट्रलियाने या दशकात भारताविरुद्ध २० सामने खेळले आहेत ज्यातील ११ सामने त्यांनी जिंकले आहेत. हे कोणत्याही संघाने दुसऱ्या संघाबरोबर एका दशकात जिंकलेले सर्वाधिक सामने आहेत.

#१२ प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानावर २० पैकी १२ सामने जिंकले आहेत.

#२५८.५ चेन्नईतील चेपॉक येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघ सरासरी २५८ धावा करतो. दुसऱ्या डावातील सरासरी २५२ची आहे.

#२०००-०१ या वर्षी भारताने ऑस्ट्रलिया विरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. असे होण्याची ती दुसरीच वेळ होती. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ८ मालिका झाल्या आहेत.

#६०० उद्या भारत घरच्या मैदानावर ६००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. असे करणार भारत तिसरा देश बनणार आहे. भारता आधी ऑस्ट्रेलिया (८६८) आणि इंग्लंड (८२७) या देशांनी ही कामगिरी केली आहे.

#९ आतापर्यंत भारताने सर्व फॉरमॅट्स मध्ये मिळून सलग ९ विजय मिळवले आहेत. असे घडण्याची ही तिसरी वेळ आहे. २०१३ मध्ये असे २ वेळा घडले आहे. जर भारताने पहिला वनडे सामना जिंकला तर हा एक नवीन विक्रम होईल. भारतीय कर्णधार म्हणून सलग १० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कोहली पाहिला खेळाडू ठरेल.

#२४ भारताने वनडेमध्ये २४ वेळा ३५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने ही तितक्याच वेळा हि कामगिरी केली आहे. जर या मालिकेत भारताने एकदाही ३५०हुन अधिक धावा केल्या तर भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर जाईल.

#१२ घरच्या मैदानावर कोहलीने १२ वनडे शतके केली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने ही तेवढीच शतके घरच्या मैदानावर केली आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर २० शतकांसह सचिन तेंडुलकर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर १३ शतकांसह रिकी पॉन्टिंग आहे. त्यानंतर कोहली आणि अमला आहेत.

#५ कोहली आणि रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी ५ वनडे शतके लगावली आहेत. तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ वनडे शतके केली आहेत.

#१२ स्टीव्ह स्मिथला ९००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी फक्त १२ धावा हव्या आहेत. असे करणारा तो ऑस्ट्रेलियाचा १६वा तर जगातला ९२वा फलंदाज बनेल.

#२३ ग्लेन मॅक्सवेलला वनडे मध्ये २००० धावा करण्यासाठी फक्त २३ धावा हव्या आहेत. असे करणारा तो २५वा ऑस्ट्रेलियन आणि जगतील २४०वा खेळाडू बनेल.

#२४ घरच्या मैदानावर ४०००धावांचा टप्पा गाठण्यासाठी धोनीला फक्त २४ धावांची गरज आहे. असे करणारा तो सचिन नंतर पहिला भारतीय फलंदाज बनेल.

#८० भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ ला ८० धावांची गरज आहे.

#२ वनडे मध्ये १०० विकेट्स घेण्यासाठी उमेश यादवला २ विकेट्सची गरज आहे असे करणारा तो १८वा भारतीय गोलंदाज बनेल.

#५ ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉल्कनरला १०० वनडे विकेट्स पूर्ण करण्यासाठी ५ विकेट्सची गरज आहे.

#१२ जेम्स फॉल्कनरला आणखीन एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे, त्याने जर या मालिकेत १२ धावा केल्या तर तो वनडे मध्ये १००० धावा पूर्ण करेल.

#२ एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध यष्टिरक्षक म्हणून धोनीला ५० बळी पूर्ण करण्यासाठी फक्त २ बळी आवश्यक आहे.

#९९ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने ९९ अर्धशतके (५० ते ९९ धावा दरम्यान ) आणखी एक अर्धशतक धोनीने केले तर भारताकडून १०० अर्धशतके करणारा तो चौथा फलंदाज बनेल.

#१०हजार: ३६ वर्षीय धोनी १७ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे कारकिर्दीतील ३०२वा सामना खेळणार आहे. सध्या धोनीच्या नावावर ३०१ वनडे सामन्यात ५२.२०च्या सरासरीने ९६५८ धावा आहेत. त्याने जर या मालिकेत ३४२ धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ १२वा खेळाडू बनणार आहे.

#७०००: सध्या विराटच्या नावावर भारतात ११७ सामन्यात ६२७६ धावा आहेत. विशेष म्हणजे कॅप्टन कूल एमएस धोनीलाही भारतात ७ हजार धावा करण्यासाठी केवळ २१ धावांची गरज आहे.

#४ विराटला या मालिकेत आणखी एक खास विक्रम करता येणार आहे तो म्हणजे भारतात वनडे सामन्यात सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथे येण्याचा. विराटने आजपर्यंत भारतात खेळलेल्या ७१ सामन्यात ५८.३९च्या सरासरीने ३५८३ धावा केल्या आहेत. विराटपुढे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड असून त्याने ९७ सामन्यात ४३.११च्या सरासरीने ३४०६ धावा केल्या आहेत.