असा विचित्र योगायोग कोणत्याही खेळाडूच्या जिवनात येवू नये!

टीम अाॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ आज दक्षिण आफ्रिकेवरून परतल्यावर माध्यमांना सामोरे गेला. यावेळी ज्या भूमीत या खेळाडूने २०१५ विश्वचषक जिंकला, आनंदोत्सव साजरा केला, आज त्याच भूमीत या खेळाडूला रडण्याची वेळ आली. 

स्मिथवर क्रिकेट अाॅस्ट्रेलियाने १२ महिन्यांची बंदी घातली आहे. माझे संघ सहकारी, चाहते आणि जगातील सर्व क्रिकेटप्रेमी आणि अाॅस्ट्रेलियाचे सर्व नागरीकांची मी मनापासून माफी मागतो. ” असे तो आज पत्रकार परिषदेत म्हणाला.

बरोबर ३ वर्षांपुर्वी क्लार्कच्या नेतृत्वाखाली आॅस्टेलिया संघाने २०१५चा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या सामन्यात स्मिथने नाबाद ५६ धावांची खेळी केली होती. ती आॅस्टेलियाकडून केलेली त्या सामन्यातील दुसरी सर्वोत्तम खेळी होती. मेलबर्न येथे हा अंतिम सामना झाला होता. 

२०१५ मध्ये अाॅस्ट्रेलिया ज्या प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक जिंकला त्याच डेरन लेहमनने आज या पदाचा राजीनामा दिला.