टॉप ५: नाणेफेक जिंकून कोहलीने केले हे ५ ‘हटके’ विक्रम आपल्या नावावर !

पल्लेकेल: श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यादरमण्यान आज येथे तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

ही नाणेफेक जेव्हा विराट जिंकला तेव्हा त्याचा नावावर अनेक विक्रम जमा झाले. त्यातील हे काही ठळक विक्रम

#२९
सलग २९ कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून विराट कोहली आधीच्या सामन्याचा संघ घेऊन उतरला नाही. २९ पैकी २९ वेळा संघात एकतरी बदल कर्णधार विराट कोहलीने केला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता.

#३
कर्णधार विराट कोहलीने श्रीलंका कसोटी मालिकेदरमण्यान ३ पैकी ३ कसोटीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

#१६
कर्णधार विराट कोहलीने आजचा सामना पकडून २९ पैकी १६ कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे.

#१
२००४ नंतर विरोधी संघात एकतरी चायनामॅन गोलंदाज असण्याची ही केवळ पहिली वेळ आहे. यापूर्वी २००४ साली दक्षिण आफ्रिका आन वेस्ट इंडिज केप टाउन कसोटी सामन्यात पॉल अॅडम्स (आफ्रिका) आणि डेव्ह मोहम्मद (विंडीज) हे दोन चायनामॅन गोलंदाज एकाच सामन्यात खेळले होते.

#३
याच मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये कर्णधार विराट कोहली एकदिवसीय मालिकेत सर्व नाणेफेक हरला होता. त्यांनतर श्रीलंका मालिकेत एकही नाणेफेक विराट हरला नाही.