दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात चेतेश्वर पुजाराला शिखर धवनच्या तर कुलदीप यादवला उमेश यादवच्या जागी संधी देण्यात आली आहे.

इंग्लंड संघाने बेन स्टोक्सच्या जागी ख्रिस वोक्सला संधी दिली आहे तर डेविड मालनच्या जागी ओली पोपला संधी देण्यात आली आहे.

5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकून इंग्लंड संघ 1-0 असा आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याचबरोबर इंग्लंडचा संघही त्यांची विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 58 कसोटी सामने झाले असुन भारताला यात फक्त 6 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर इंग्लंडने 31 सामने जिंकले आहेत आणि 21 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

भारताने इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स मैदानावर 17 कसोटी सामने खेळले असून त्यातील 2 सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. तसेच 11 सामन्यात पराभव पत्करला आहे, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारताने 1986 साली लॉर्ड्सवर पहिला कसोटी विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 ला भारताने लॉर्ड्सवर कसोटी विजय मिळवला आहे. 2014 नंतर भारत आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर कसोटी सामना झालेला नाही.

असा आहे ११ जणांचा संघ:

भारत: विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

इंग्लंड: अँलिस्टर कुक, केटॉन जेनिंग्स, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअस्ट्रो, जॉश बटलर, ख्रिस वोक्स, सॅम करन, आदिल राशिद, जेम्स अॅंडरसन,  स्टुअर्ट ब्रॉड.

इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे दुसरा कसोटी सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना 9 आॅगस्ट 2018 पासून सुरु होणार आहे.

कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सोनी टेन 3,सोनी टेन 3 एचडी, सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना पाहता येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण

सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार

-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात!