मैदान सुकण्यासाठी हैद्राबादमध्ये तीन फॅन करताय काम !

हैद्राबाद । राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हैद्राबाद येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी२० सामना होत आहे. सामना कोणत्याही विग्नाशिवाय पार पडावा म्हणून आज येथे मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या आहेत.

गेल्या एक आठवड्यापासून या शहरात पाऊस पडत आहे. पहिल्या टी२० सामन्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची निराशा झाली.

क्युरेटर वायएस चंद्रशेखर यांच्या म्हणण्यानुसार पावसाचा कोणताही परिणाम मैदानावर होणार नाही. मैदानाचा काही भाग ओला आहे परंतु फॅन्सने तू सुकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विविध कार्यक्रमात वापरण्यात येणारे फॅन्स यासाठी वापरण्यात येत आहे. अशा प्रकारे मैदान वाळवलेले सहसा क्रिकेटमध्ये पहिले जात नाही. त्यामुळे सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ३ सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत असून आज जिंकणारा संघ मालिका जिंकणार आहे.