प्रो कबड्डी: दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये झालेले खास ३ विक्रम

प्रो कबड्डीमध्ये काल पटणा पायरेट्स आणि हरयाणा स्टीलर्स या संघात दुसरा एलिमिनेटर सामना झाला. हा सामना बऱ्याच करणांनी चर्चेत राहिला. या सामन्यात अनेक विक्रम झाले आणि अश्या काही गोष्टी घडल्या की ज्याची फक्त कल्पना केली जायची.

या सामन्यात झालेले रेडींगमध्ये खास ३ विक्रम –

# प्रो कबड्डीमध्ये काल डिबकी किंग, प्रो कबड्डीमधील विक्रमांचा बादशाह प्रदीप नरवाल याने प्रो कबड्डीच्या एका मोसमात ३०० रेडींग गुण मिळवण्याचा विक्रम प्रस्थापीत केला. या अगोदर प्रो कबड्डीच्या एका मोसमात सर्वाधीक गुणांचा विक्रम अनुप कुमारच्या नावे होता. त्याने पहिल्या मोसमात १६ सामने खेळताना १६९ गुण मिळवले होते. त्यातील १५५ गुण रेडींगमधील होते तर बाकीचे १४ गुण डिफेन्समधील होते.

प्रदीपने पटणा लेगमध्ये या मोसमात १२ सामने खेळताना अनुपचा विक्रम सर्वाधिक रिडींग गुणांचा विक्रम मोडला होता. त्यानंतर तो एका मोसमात २०० गुण मिळवणारा खेळाडू बनला होता. त्यानंतर त्याने कामगिरीचा आलेख वाढवत २५० चा आकडा पार केला. २५०चा आकडा पार केल्यानंतर त्याला वेध लागले ते ३०० गुण मिळवण्याचे आणि त्याने काल २३व्या सामन्यात ३०० रेडींग गुणांचा टप्पा पार केला. त्याच्या नावावर सध्या ३०८ गुण आहेत, विशेष बाब म्हणजे सर्व गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत.

# एका सामन्यात सर्वाधिक रेडींग गुणांचा विक्रम –
कालच्या सामन्यात प्रदीपने एका सामन्यात सर्वाधिक ३४ गुण मिळवले आणि नवीन विक्रम केला. या सामन्यात त्याने रोहित कुमारचा एका सामन्यात सर्वाधिक ३० रेडींग गुंणाचा विक्रम मोडला. रोहितने युपी विरुद्धच्या सामन्यात ३० रेडींग गुण मिळवत रिशांक देवाडीगा २८ रेडींग गुणांचा विक्रम केला.

# एका रेडींगमध्ये सर्वाधिक ८ गुण –
कालच्या सामन्यात प्रदीपने दुसऱ्या सत्रात एका रेडमध्ये विरोधी संघातील सहा खेळाडूंना बाद करत सहा गुण तर मिळवलेच त्याचबरोबर त्याच्या रेडमध्ये पूर्ण हरयाणा संघ बाद झाल्याने ऑल आऊटचे दोन गुण देखील मिळवले. त्यामुळे या रेडमध्ये त्याला आठ गुण मिळवले. प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वाधिक गुण मिळवणारी ही रेड ठरली आहे.