पहिली कसोटी: दक्षिण आफ्रिकेचा हा मोठा फलंदाज तंबूत, ६ बाद ९२ अशी अवस्था

केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेसाठी सकाळचे सत्र खूपच खराब ठरत आहे. आफ्रिकेचे ९ षटकांत ४ फलंदाज तंबूत परतले आहेत.

३१व्या षटकात चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर डिकॉकने वृद्धिमान सहाकडे झेल दिला. मोठ्या प्रमाणावर अपील होऊनही त्याला पंचांनी बाद दिले नाही. त्यावेळी कर्णधार कोहलीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यात डिकॉक बाद असल्याचं स्पष्ट दिसले.

त्यामुळे २ बाद ५९वरून आफ्रिकेची अवस्था ६ बाद ९४ अशी झाली आहे. डिव्हिलिअर्स १८ तर फिलेन्डर ० धावांवर खेळत आहे.