या देशाकडे आहेत ३०० वनडे सामने खेळणारे सर्वाधिक खेळाडू !

0 92

भारताकडून काल श्रीलंकेविरूद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३०० वनडे सामने खेळण्याचा विक्रम केला. असे करणारा तो जगभरातील २०वा खेळाडू बनला आहे. याच वर्षी युवराज सिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कारकिर्दीतील ३०० एकदिवसीय सामना खेळला.

भारताकडून ३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणारा धोनी ६वा खेळाडू आहे. या यादीत सचिन ४६३, द्रविड ३४४, अझरउद्दीन ३३४, गांगुली ३११, युवराज सिंग ३०४ हे भारतीय खेळाडू आहेत. ३०० एकदिवसीय सामने खेळूनसुद्धा धोनीची सरासरी ५० पेक्षा अधिक आहे.

३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या देशांची यादी खालीलप्रमाणे
१. श्रीलंका ७
२. भारत ६
३. पाकिस्तान ३
४. दक्षिण आफ्रिका २
५. ऑस्ट्रेलिया २

Comments
Loading...
%d bloggers like this: