एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी

पुणे। नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे सहाव्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी असुन यामध्ये 1000 ब्लॉईंड फोल्डेड धावपटू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रविवार, दि. 21 जुलै 2019 या दिवशी होणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ)चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांनी सांगितले की, आज अंधत्वातने ग्रासलेल्या किमान 31 दशलक्ष नागरिकांना आपल्या अंधत्वावरील उपचारांचे योग्य व्यवस्थापन करता आले असते किंवा हे अंधत्व त्यांना पूर्णपणे टाळणेही शक्य झाले असते. भारतातील अंधांची संख्या जगातील एकूण अंधांच्या 75 टक्के इतकी आहे. आपल्या मुलांमधील किंवा 30 वर्षांवरील प्रौढांमधील टाळता येण्याजोग्या अंधत्वाचे प्रमाण लक्षणीय आहे. खरे म्हणजे ग्लाकोमा, मोतीबिंदू किंवा मधुमेह हे समजण्यासाठी केल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचण्या अतिशय सर्वसामान्य आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीचे अधिक नुकसान होणे टाळता येऊ शकते.

डॉ आदित्य आणि डॉ जाई केळकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून टाळता येण्याजोग्या अंधत्वाचे उच्चाटन ही मोहीम हाती घेतली असून या उपक्रमांतर्गत त्यांनी दारिद्रय रेषेखालील 700हुन अधिक रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत. या उपक्रमांर्गत आयोजित करण्यात आलेली एनआयओ व्हिजन मॅराथॉन ही डॉक्टर कुटुंबियांचा मोहिमेचाच एक भाग आहे.

स्पर्धेविषयी माहिती देताना रनबडिज्‌ क्लबचे निखिल शहा आणि अरविंद बिजवे यांनी सांगितले की, रनबडिज्‌ क्लब या शहरांतील महत्वाच्या संस्थेच्या संलग्नतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 3कि.मी, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात होणार आहे. यामध्ये यापैकी कुठल्याही शर्यतीत तुम्ही एक साथीदार डोळेबांधून धावू शकता किंवा अर्धे तुम्ही धावायचे आणि अर्धे तुमच्या साथीदाराने धावायचे अशा अनोख्या व नाविन्यपूर्ण संकल्पनेचा यात समावेश आहे.

रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथे स्पर्धेचा फ्लॅग ऑफ होईल. स्पर्धेचा मार्ग रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ होणार असून औंधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग असणार आहे. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ एनआयओचे डॉ.श्रीकांत केळकर व अरुणा केळकर, एनआयओच्या संचालिका डॉ. आदित्य केळकर, डॉ. जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे. एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत गतवर्षी नोंदविलेला विक्रम यावर्षी मोडीत काढून एक नवा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.