विम्बल्डन: काल फेडररने केले आश्चर्यचकित करणारे टेनिस विक्रम

काल रॉजर फेडररने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले. याबरोबर फेडररने फॅब ४ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरे, नदाल, जोकोविच यापैकी एकट्यानेच उपांत्यफेरी गाठली.

मिलोस राओनिकवरील विजयबरोबर फेडररने असंख्य विक्रमांना गवसणी घातली. ३५ वर्षीय फेडररचे हे खास विक्रम

# कालचा सामना हा फेडेरेरचा विम्बल्डनमधील १०० वा सामना होता.

# कालचा विजय हा फेडररचा विम्बल्डनमधील ८९ वा विजय होता.

# फेडरर विक्रमी १२ व्या विम्बल्डन उपांत्यफेरीत पोहचला आहे. हाही एक विश्वविक्रम आहे.

# उपांत्यफेरीत पोहोचणारा फेडरर हा १९७४ नंतरचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.

# ३० वय पूर्ण केल्यावर फेडरर ६ विम्बल्डन खेळला असून त्यातील त्याची ही पाचवी उपांत्यफेरी आहे.

# फेडरर आजपर्यंत ५० उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळला असून ही त्याची ४२ वी उपांत्यफेरी आहे. म्हणजेच फेडरर केवळ ८ सामने उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आहे.