कर्णधार कोहलीच्या नावावर एक नकोसा असा विक्रम !

जोहान्सबर्ग । आज येथे सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु याबरोबर त्याच्या नावावर एक नकोसा असा विक्रमही झाला.

आज जेव्हा भारतीय संघ मैदानात उतराला तेव्हा संघात २ बदल करण्यात आले होते. विराट कोहलीने कर्णधार म्हणून सलग दोन कसोटी सामन्यात कधीही सारखा संघ मैदानात उतरवला नाही. विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा ३५ सामना असून यातील कोणत्याही दोन सलग सामन्यात कर्णधार कोहलीने संघात एकतरी बदल केला आहे.

आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणेला तर आर अश्विनच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली. कसोटी कर्णधार म्हणून विराटचा हा ३५वा सामना आहे. परंतु कोणत्याही दोन सलग सामन्यात विराट आजपर्यंत कधीही सारखाच संघ घेऊन मैदानात उतरलेला नाही. त्याने ३५ कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या सामन्यात संघात एकतरी बदल केलेला आहे.

यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने कसोटी कर्णधार झाल्यानंतर सलग २८ कसोटीत सलग दोन सामन्यात कधीही सारखाच संघ मैदानात उतरवला नव्हता. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये ग्रॅम स्मिथने तब्बल ४४ सामन्यात संघात बदल केला होता.