३९९८ खेळाडूंना संपुर्ण कारकिर्दीत न जमलेली गोष्ट रोहित शर्मा केवळ १ वर्षात करुन दाखवली

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने नाबाद शतक करताना विश्वविक्रम रचला आहे.

रोहितने या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. हे रोहितचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील चौथे शतक आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये चार शतके करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. आत्तापर्यंत असा पराक्रम कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाव्हता.

 केला खास पराक्रम- 

रोहितने २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात ६९ षटकार मारले आहेत. एका वर्षात एवढे षटकार आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला मारता आले नाहीत. तसेच एका वर्षात सर्वाधिक वेळा षटकार मारण्याच्या यादीत रोहितच दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २०१७मध्ये ६५ षटकार मारले होते.

जागतिक क्रिकेटमध्ये आजपर्यंत कसोटी, वनडे आणि टी२० मध्ये एकूण ४१३७ खेळाडूंनी भाग घेतला आहे. यातील केवळ १३९ खेळाडूंना संपुर्ण कारकिर्दीत ६९ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत. म्हणजेच रोहितने एका वर्षात जेवढे षटकार मारले तेवढे षटकार ३९९८ खेळाडूंना संपुर्ण कारकिर्दीत मारता आले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या:

बापरे! एकाच ओव्हरमध्ये फलंदाजांनी कुटल्या चक्क ४३ धावा

धोनी, विराट नव्हे तर कर्णधार रोहित शर्माने केला आहे हा मोठा पराक्रम

म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच…

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम

रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा़

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल