संपूर्ण यादी: फेडेरेशन कपमध्ये हे महिलांचे संघ होणार सहभागी

मुंबई । फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे ८ संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ज्या ८ संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती त्या संघाना या स्पर्धेत संधी देण्यात येणार आहे.

हैद्राबाद येथे झालेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यामुळे महाराष्ट्र संघ यासाठी पात्र ठरला आहे.

यजमान महाराष्ट्राच्या महिलांच्या संघांसह हिमाचल प्रदेश, भारतीय रेल्वे, उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ, हरियाणा आणि छत्तीसगढ हे संघ सहभागी होणार आहेत.

गोरगन इराण येथील स्पर्धेत भारताचा नेतृत्व केलेल्या अभिलाषा म्हात्रे आणि ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राज्याचं नेतृत्व केलेल्या सायली जाधव या महाराष्ट्राकडून खेळताना दिसतील.