भारताला मालिकेत विजयी बढत घेण्याची संधी !

पलाकेले: येथे आज श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेतला तिसरा सामना होणार आहे. भारताने मालिकेत २-० अशी बढत घेतली आहे तर श्रीलंकेला जर मालिका जिवंत ठेवायची असेल तर त्यांच्यासाठी हा सामना करो या मरो असेल.

मालिकेतील पहिला सामना जरी कसोटी मालिके प्रमाणे एकतर्फी झाला असला तरी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने चांगले पुनरागमन केले होते. जर महेंद्र सिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमारने ८व्या विकेट साठी १०० धावांची भागीदारी केली नसती तर मालिका १-१ अशी बरोबरीत असली असती. आखिला धनंजाया या फिरकी गोलंदाजाने श्रीलंकेसाठी जवळ जवळ सामना जिंकलाच होता. श्रीलंकेने जरी मागील सामना जिंकला नसला तरी धनंजाया च्या कामगिरीमुळे त्यांचे मनोधर्य नक्कीच उंचावले आहे. पण श्रीलंकेला जर मालिकेत जिवंत राहायचे आले तर त्यांच्या फलंदाजीने चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.

दुसऱ्या बाजूला भारताने पहिला सामना ९ विकेट्सने जिंकला आणि भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात सलामीवीरांनी चांगली सुरुवात मिळवून दिली पण धनंजायाच्या गोलंदाजीचा सामना करणे मधल्या फळीतील फलंदाजांना जमलेच नाही. धोनी आणि भुवनेश्वर जेव्हा खेळपट्टीवर नवीन नवीन आले तेव्हा कर्णधाराने बचावात्मक क्षेत्ररक्षण लावले आणि धनंजायाला गोलंदाजीवरून काढले आणि त्यामुळेच सामना भारताच्या बाजूने वळाला.

मागील सामने

श्रीलंका

हार, हार, हार, हार, विजय.

भारत

विजय, विजय, विजय, हार, विजय.

स्पॉटलाईट मधील खेळाडू

आखिला धनंजाया – श्रीलंका

झिम्बोंबे विरुद्धच्या मालिकेत त्याने शेवटच्या सामन्यत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तरी सुद्धा त्याला भारत विरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघात स्थान मिळाले नव्हते. दुसरा सामन्यात जेव्हा त्याला संधी देण्यात आली तेव्हा त्याने त्या संधीचे सोने केले. इतिहास बघता नवीन फिरकी गोलंदाजांन विरुद्ध खेळताना भारताच्या फलंदाजांनी नेहमीच नांगी टाकली आहे, पण २,३ सामन्या नंतर भारतीय फलंदाज त्याच गोलंदाजा विरुद्ध सुरेख फटकेबाजी करतात असे दिसून येते. आता धनंजया च्या बाबतीत पण असेच होणार का ? हे बघण्या सारखे असेल.

लोकेश राहुल – भारत

भारताने राहुला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून एक जुगार खेळाला होता आणि तो भारता विरुधातच गेला. धनंजयाने सुरेख गोलंदाजी करत त्याला आपल्या जाळ्यात अडकवला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी भारताकडे भरपूर पर्याय आहेत त्यामुळे राहुलने स्वतःची जागा कायम राखण्यासाठी चांगली करणे आत्यावश्यक आहे. राहणे वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता तरी सुद्धा कर्णधाराने त्याला बसवून राहुलवर विश्वास दाखवला आहे.

संभाव्य संघ

श्रीलंका: निरोशान डिकेवेल, लाहिरू थिरिमने, कुसल मेंडिस, दिनेश चंदिलाल,अँजेलो मॅथ्यूज, मिलिंडा सिरीवाडाना, चामरा कपुगेदेवरा (कर्णधार), अकिला दानंजय, दुश्मंता चामेरा, विश्व फर्नांडो, लसिथ मलिंगा.

भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बूमरा, यज्वेंद्र चहल.

खेळपट्टीचा अनुमान

मागील सामान्यत धनंजयाची कामगिरी लक्षात घेता हि खेळपट्टी सुद्धा फिरक गोलंदाजांना अनुकूल असेल असे दिसून येते. सामन्यवर पावसाचे सावट राहील.