तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे ३७७ धावांची मोठी आघाडी आहे.

इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांतच काल कोलमडला. यामुळे भारताने पहिल्या डावात १६८ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर २ बाद १२४ धावा केल्या होत्या.

आज कालच्या २ बाद १२४ वरुन पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या भारताने ६६ षटकांत २०९ धावा केल्या आहेत.

कर्णधार विराट कोहली ११३ चेंडूत ६१ तर चेतेश्वर पुजारा १८८ चेंडूत ६५ धावांवर खेळत आहे. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके केली असुन शतकी खेळीकडे वाटचाल सुरु केली आहे.

मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या कसोटीत विजय महत्त्वाचा आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स

आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती