तिसरी कसोटी: श्रीलंकेला ४था धक्का, भारताला जिंकण्यासाठी ६ विकेट्सची गरज

दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारताला जिंकण्यासाठी ६६ षटकांत ६ विकेट्सची गरज आहे.

३ बाद ३३ या कालच्या धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेच्या ४०.२ षटकांत ४ बाद १०४ धावा झाल्या असून त्यांना जिंकण्यासाठी अजूनही ३०६ धावांची गरज आहे.

आज सकाळच्या सत्रात बर्थडे बॉय रवींद्र जडेजाने भारताला पहिली विकेट मिळवून देताना मागील डावातील शतकवीर अँजेलो मॅथ्यूजला अजिंक्य रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले.

अँजेलो मॅथ्यूजला याबरोबर जडेजाने कसोटीत ६व्यांदा बाद केले.