तिसरी कसोटी: अजिंक्य रहाणे १७ धावांवर बाद !

पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अजिंक्य रहाणे १७ धावांवर बाद झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात रहाणेने शतकी खेळी केली होती.

पुषाकुमारच्या एका आत येणाऱ्या चेंडूला बॅटची कड लागून चेंडूने मधल्या यष्टीचा वेध घेतला. याबरोबर पुष्पाकुमारच्या खात्यात तिसरी विकेट जमा झाली.

सद्य स्थितीत भारत ४ बाद २६९ धावांवर खेळत असून मैदानावर कर्णधार विराट कोहली आणि आर अश्विन हे खेळाडू आहेत. विराट २९ वर तर अश्विन १ धावेवर खेळत आहेत.