फेडरेशन कप: महाराष्ट्राच्या कबड्डी संघात ४ बदल अपेक्षित

0 867

मुंबई । या महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दोन्ही संघात ४ बदल अपेक्षित असल्याचे मत आज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सचिव अस्वाद पाटील यांनी व्यक्त केलं.

३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या काळात संघाचा कॅम्प रायगड जिह्ल्यातील अलिबाग येथे होणार आहे.

याबद्दल आज महा स्पोर्ट्सशी बोलताना सचिव अस्वाद पाटील म्हणाले, ” संघाचा कॅम्प अलिबाग येथे होणार आहे. आम्ही फेडरेशन कपमधील संघ निवडीच्या नियमानुसार संघात जास्तीतजास्त ४ बदल करू शकतो. महाराष्ट्रातील अन्य प्रतिभावान खेळाडूंनाही राष्ट्रीय स्थरावरील स्पर्धा खेळता यावी म्हणून आम्ही दोन्ही संघात ४ बदल करणार आहोत. “

“कर्णधारपद हे जवळपास त्याच खेळाडूंकडे कायम राहील. परंतु याचा अंतिम निर्णय आम्ही ६ तारखेलाच घेऊ. ” असेही महिला संघाच्या कर्णधारपदाबद्दल विचारले असता ते म्हणाले.

तिसरा फेडरेशन कप मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशन आयोजित करत असून ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या काळात ही एसआरपीएफ क्रीडांगण, जयकोच, पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी येथे ही स्पर्धा होणार आहे.

उपलब्ध माहितीप्रमाणे या स्पर्धेचे प्रथम १९८२ मध्ये प्रथम आयोजन झाले होते तर २०१७मध्ये इंदोर शहरात ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत खेळलेले महिला आणि पुरुष गटाचे संघ भाग घेणार आहे.

दोन्ही गटाचे मिळून एकूण १६ संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील. त्यामुळे एकप्रकारे कबड्डीमधील भारतातील दिग्गज संघ या स्पर्धेत भाग घेताना दिसतील.

Comments
Loading...
%d bloggers like this: