फेडरेशन कप: या ४ खेळाडूंना महाराष्ट्राच्या कबड्डी संघातून वगळले

मुंबई । पुढच्या आठवडयात होणाऱ्या फेडेरेशन चषक कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष संभाव्य संघातून ४ खेळाडूंना वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. या चार खेळाडूंमध्ये सचिन शिंगाडे, अजिंक्य कापरे, रवी ढगे आणि सिद्धार्थ देसाई या खेळाडूंचा समावेश आहे.

फेडरेशन चषक ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या काळात एसआरपीएफ क्रीडांगण, जयकोच, पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी येथे होणार आहे.

या खेळाडूंच्या जागी विशाल माने, युवराज जाधव, कृष्णा मदने आणि उमेश म्हात्रे यांना स्थान देण्यात आले आहे.

हैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तब्बल ४ वर्षांनी विजेतेपद मिळवले होते. त्या संघातील ४ खेळाडूंना या स्पर्धेत वगळण्यात आले आहे. बाकी संघ आहे तसाच या स्पर्धेत कायम राहणार आहे.

उद्यापासून ७ फेब्रुवारीपर्यंत संघाचे सराव शिबीर अलिबाग येथे होणार असून ६ तारखेला संघाची अधिकृत घोषणा होणार आहे.

असा आहे संभाव्य संघ:
रिशांक देवाडिगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे (पुणे), गिरीश इर्नाक(ठाणे), विराज लांडगे(पुणे), नितीन मदने(सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंखे(ठाणे), ऋतुराज कोरवी(कोल्हापूर), विशाल माने, युवराज जाधव, कृष्णा मदने आणि उमेश म्हात्रे