४ गोष्टी ज्यामुळे बांग्लादेशला संघाला पत्करावी लागली इंग्लंडकडून मोठी हार !

बांग्लादेशने या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात धमाकेदार केली. बांग्लादेशच्या सलामीचा फलंदाज तमिन इकबालने शतक ठोकले तर रहिमने त्याला चांगली साथ दिली. बांग्लादेशाने पाहिल्या डावात ३०६ धावांचा डोंगर उभारला , पण रूटच्या शतकामुळे ३०० धावाही बांग्लादेशला अपुऱ्या पडल्या. इंग्लंडकडून सलामीला उतरलेल्या अॅलेक्स हेल्सने ही उत्तम फटकेबाजी केली पण तो ९५ धावांवर बाद झाला.

बांग्लादेशाच्या तमींन इकबाल आणि रहीम यांनी १६६ धावांची भागीदारी रचली आणि इंग्लंडपुढे एवढे मोठे लक्ष ठेवले. इंग्लंडची सुरवात चांगली झाली नाही, सलामीचा फलंदाज जेसन रॉय लवकरच पॅव्हिलिअनमध्ये परतला. त्यानंतर हेल्स आणि रूटने इंग्लंडचा डाव सांभाळला आणि हेल्स बाद झाल्यानंतर मॉर्गनने रूटची साथ दिली आणि सामना इंग्लंडच्या खिशात घातला. पाहुयात बांग्लादेशच्या काही चुका ज्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला.

४. मेहंदी हसनला न खेळवणे

मेहंदी हसन हा बांग्लादेशासाठी मागील काही काळात खूपच उत्तम गोलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजांना धूळ चारली होती. फिरकी गोलंदाजांना खेळणे हे इंग्लंडच्या फलंदाजांना अवघड जाते हे सर्वांना माहित आहे. तरीही त्याला बसवून मोसादेक हुसेनला खेळवण्याचा निर्णय बांग्लादेशने घेतला.

३. शेवटच्या षटकात फटकेबाजी न करणे

पाच षटके राहिलेली असताना बांग्लादेशचे सेट फलंदाज बाद झाले आणि त्यानंतरच्या फलंदाजांना चांगली फटकेबाजी जमलीच नाही. २६० धावाझालेलया असताना आणि ७ विकेट्स हातात असताना बांग्लादेशकडून ५ शतकात किमान ६०-७०धावांची अपेक्षा होती पण बांग्लादेशच्या तळाच्या फलंदाजांना ते जमले नाही.

२. बचावात्मक दृष्टिकोन

हेल्स बाद झाल्यानंतर बांग्लादेशच्या कर्णधाराने आक्रमक क्षेत्ररक्षण लावणे अपेक्षित होते पण असे काही झाले नाही. यामुळे मॉर्गन आणि रूट दोघांनाही सेट होण्याचा वेळ मिळाला आणि मग नंतर त्यानीच सामन्याचा निकाल लावला .

१. मुस्ताफिझूरचा योग्य वापर करता आला नाही

कमी वयातच जगभरात प्रसिद्ध झालेल्या फिझ्झच्या गोलंदाजीचा वापर बांग्लादेशला जमला नाही. पॉवरप्ले मध्ये २ षटके टाकल्यानंतर कर्णधार मोर्तझाने फिझ्झला २१व्या षटकापर्यंत गोलंदाजी दिली नाही आणि तो पर्यंत रूट सेट झाला. हेल्सची विकेट फिझ्झला घेता आली पण रूटची विकेट मात्र तो घेऊ शकला नाही आणि रूटने शेवट पर्यंत थांबून इंग्लंडला सामना जिंकून दिला.