प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

प्रो कबड्डीच्या ६ व्या हंगामासाठी लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या असून ३० व ३१ मे रोजी हा लिलाव मुंबईत पार पडणार आहे.कबड्डी रसिकांचे लक्ष या लिलावकडे असेल कारण अनुप कुमार,राहुल चौधरी,मनजीत चिल्लर सारख्या मोठ्या खेळाडूंना त्यांच्या संघांकडून कायम करण्यात आलेले नाही.

त्यामुळे या दिग्गजांना आपल्या संघात समाविष्ट करून घेण्यासाठी फ्रँचायजीजमध्ये चांगलीच रस्सीखेच बघायला मिळेल यात शंका नाही.

जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व गोष्टी:

१.एकूण ४२२ खेळाडूंचा समावेश यातील ५८ खेळाडू विदेशी असतील तर ८७ खेळाडू हे “फ्युचर कबड्डी हिरोज(FKH)” या राष्ट्रीय प्रतिभा शोध कार्यक्रमातील असतील.

२. १४ देशांच्या खेळाडूंचा समावेश.इराण,बांगलादेश,जपान,कोरिया,केनिया,मलेशिया,श्रीलंका,इ. देशातील खेळाडू आजमावणार आपले नशीब.

३. ९ फ्रँचायजीजने काही खेळाडूंना कायम केले असून ३ फ्रँचायजीज मात्र नव्याने संघ बांधणी करणार आहेत.

४.संघात कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २५ खेळाडू समाविष्ट केले जाऊ शकतात.

५.एका संघात “फ्युचर कबड्डी हिरोज(FKH)” कार्यक्रमातील जास्तीत जास्त ३ खेळाडू घेतले जाऊ शकतात.

६.फ्रँचायजीजने पूर्वीचे ४ इलायीट खेळाडू कायम केलेले असतील तर त्यांना लिलावात एका वेळेस “फायनल बीड मॅच” चा पर्याय वापरता येणार आहे. यात फ्रँचायजीज आपल्या पूर्वीच्या पण कायम न केलेल्या खेळाडूवर लागलेल्या महत्तम बोली इतकी बोली लावून त्या खेळाडूला पुन्हा आपल्या संघात घेऊ शकते.

७.जर फ्रँचायजीजने ४ पेक्षा कमी खेळाडू कायम केलेले असतील तर त्यांना दोनदा ” फायनल बीड मॅच” चा पर्याय वापरता येईल.

८.संघातील विदेशी खेळाडूंची संख्या २ ते ४ असू शकते.

९.फ्रँचायजीजना संपूर्ण संघ खरेदीसाठी ४ कोटी रुपयांचे बंधन असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!

विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?

-आयपीएल इतिहासात हा ठरला सर्वात महागडा गोलंदाज

संघ पराभूत झाला म्हणून काय झाले, तो विक्रम तर भारतीय खेळाडूच्या नावावर झाला

महिलांच्या ऐतिहासिक आयपीएल टी२०साठी संघांची घोषणा