या तीन खेळाडूंना मिळाली चौथ्या वनडे सामन्यात संधी

आज भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. महान फलंदाज एमएस धोनीचा हा ३००वा सामना आहे.

या सामन्यात शार्दूल ठाकूरला आंतरराष्ट्रीय पदार्पणची संधी मिळाली असून तो भुवनेश्वर कुमारच्या जागी खेळेल. अन्य खेळाडूंमध्ये केदार जाधव आणि युझवेन्द्र चहल यांना संघात स्थान देण्यात आले नाही. तर मनीष पांडे आणि कुलदीप यादव यांनी संघात पुनरागमन केले आहे.

शार्दूल ठाकूर हा मुंबईकर खेळाडू नोव्हेंबर २०१२ पासून मुंबई रणजी संघाचा सदस्य आहे. तब्बल ४९ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या २५ वर्षीय शार्दूलने प्रथम श्रेणीमध्ये १६९ बळी घेतले आहे.

भारताकडून २०१७मध्ये वनडेमध्ये केवळ कुलदीप यादव या खेळाडूने पदार्पण केले होते त्याचा वनडे कॅप नंबर आहे २१७. जर शार्दूल ठाकूर आता भारताचा २१८ वा वनडे खेळाडू आहे.