शेवटच्या कसोटीमध्ये हे विक्रम बनले!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवसाखेर भारत मजबूत स्थितीत असून विजयाची औपचारिकता बाकी आहे. भारताला ही ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यासाठी फक्त ८७ धावांची गरज असून भारताकडे १० विकेट्स बाकी आहेत. ह्या सामन्यात विविध रेकॉर्डस् बनले आहेत. ते याप्रमाणे
डावखुऱ्या गोलंदाजांचे पहिल्या ३० कसोटीमधील बळी
१४२ रवींद्र जडेजा
१३७ मिचेल जॉन्सन
१३२ बिल जॉन्स्टन
१३२ डेरेक अंडरवूड

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजाकडून बळी
२८ कपिल देव, १९७९
२५ कपिल देव, १९९१
१९ मनोज प्रभाकर, १९९१
१७* उमेश यादव, २०१७

उपहारानंतरच्या सत्रातील ऑस्ट्रेलियाची कामगिरी
पहिला दिवस: ७७/५, ३० षटक
दुसरा दिवस: ९२/५, ३० षटक

गेल्या ३० वर्षात भारतात सर्वाधिक बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज
१७ श्रीनाथ विरुद्ध आफ्रिका, १९९६
१६ उमेश यादव विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१७
१५ इशांत शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००८

भारतात विरुद्ध भारतात कसोटी मालिकेत सार्वधिक धावा करणारे कर्णधार
६३६ लॉईड
५९४ ह्युजेस
५६२ कूक
५३८ कालिचरण
४९९ स्मिथ

डेव्हिड वॉर्नर साठी खराब ठरलेल्या कसोटी मालिका
१३.०० न्यूजीलँडमध्ये, २०१५-१६
२३.०० इंग्लंड २०१३
२४.१२ भारत, २०१६-१७
२४.३७ भारत, २०१२-१३

भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारे फिरकी गोलंदाज
१०५ मुरलीधरन
६४ लायन
६३ गिब्स
६२ अंडरवूड
५२ बेनाऊड

एका मोसमात कसोटीमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारे भारतीय
२१ जडेजा (२०१६-१७)
१७ हरभजन (२०१०-११)
१६ सेहवाग (२००३-०४)
१४ सिद्धू (१९९३-९४)

एका मोसमात कसोटीमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारे खेळाडू
२६ गिलख्रिस्ट (२००४-०५)
२४ मॅक्क्युलम (२०१४-१५)
२१ हेडन (२००३-०४)
२१ जडेजा (२०१६-१७)