पाकिस्तानच्या २१८ फलंदाजांना जे जमले नाही ते विराटने करुन दाखवले

विशाखापट्टनम। आज(24 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने वनडेतील 37 वे शतक झळकावले आहे. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 321 धावा केल्या.

या सामन्यात विराटने 129 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकार मारताना नाबाद 157 धावांची खेळी केली. याबरोबरच विराटची वनडेमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही चौथी वेळ ठरली.

तो वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने 6 वेळा असा कारनामा केला आहे. यातील तीन वेळा तर त्याने द्विशतके केली आहेत.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 5 वेळा 150 पेक्षा अधिक धावांचा टप्पा पार केला आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानकडून वनडे क्रिकेटमध्ये खेळलेल्या  218 खेळाडूंना मिळून फक्त 4 वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा पार केला गेला आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 150 पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू:

6 – रोहित शर्मा

5 – सचिन तेंडुलकर / डेव्हिड वॉर्नर

4 – हाशिम अमला / ख्रिस गेल / सनथ जयसुर्या / विराट कोहली

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहली कर्णधार म्हणूनही ठरला हीट; कधीही विचार केला नाही असा विक्रम आता खिशात

१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम

कोहलीच कोहली; एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले