कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे.

असे असले तरी कर्णधार विराट कोहलीकडून या सामन्यात एक नकोसा विक्रम थांबण्याची चिन्हे आहेत. २०१४पासून विराटने भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद सांभाळले आहे. त्यात ३८ सामन्यात २२ विजय आणि ७ पराभवाला संघाला सामोरे जावे लागले आहे तर ९ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहे.

असे असले तरी कोणत्याही दोन लागोपाठच्या कसोटीत भारतीय संघाचे ११ खेळाडू सारखेच राहिले नाहीत. त्यात सलग ३७ वेळा विराटने एकतरी बदल केला आहे.

भारतीय संघ तिसरा सामना जिंकल्यामुळे चौथ्या सामन्यात तरी संघ कायम राहिल अशी अपेक्षा चाहते करत आहेत.

ग्रॅमी स्मिथने तब्बल ४३ कसोटीत लागोपाठच्या सामन्यात कधीही सारखाच संघ मैदानात उतरवला नाही. त्याने त्यात एकतरी बदल केला होता.

लागोपाठच्या सामन्यात सारखाच संघ घेऊन न खेळणारे कर्णधार (कसोटी सामने)

४३- ग्रॅमी स्मिथ

३८- विराट कोहली

३४- मुशफिकुर रहीम

३१- राय इलिंगवर्थ

२८- सौरव गांगुली

महत्त्वाच्या बातम्या-

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

– एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

– भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी