पाचव्या वनडे सामन्यात होणार हे पाच मोठे बदल

भारताने कोलंबो येथील सामन्यात १६९ धावांनी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवून या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला आता या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची हि संधी असणार आहे. पण त्याच वेळी संघ काही राखीव खेळाडूंनाही मैदानात उतरवण्याचा ही विचार करेल व फलंदाजीच्या क्रमांकामध्ये ही बदल करण्याचा शक्यता आहे.

ही मालिका भारताने जिंकली आहे, त्यामुळे विश्व्चषक २०१९ साठी संघबांधणीचा विचार करता वेगळे प्रयॊग करणे व पर्याय वापरून पाहायला काहीच हरकत नाही. याचाच एक भाग म्हणून काही विभागात भारत हे बदल करू शकतो!

१. हार्दिक पंड्याचा हावा तसा वापर !

आयपीएल प्रॉडक्ट ते भारताचा टी-२० स्टार ते ५० षटकातील एक अष्टपैलू फलंदाज ते आता श्रीलंकेमध्ये अप्रतिम कसोटी पदार्पण, मागील दीड वर्षात ज्याही गोष्टीला हार्दिकने हाथ लावला आहे त्या गोष्टीचे त्यानेसोने केले आहे. पंड्या आता एक परिपूर्ण अष्टपैलू क्रिकेटपटू आहे असे म्हणायला हरकत नाही.

पण तरी सुद्धा हार्दिकमध्ये सातत्याची कमी दिसून येत आहे. त्याला जर भारतीय संघात आपली जागा कायम करायची असेल तर त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनीही आघाड्यांमध्ये चांगला खेळ करणे गरजेचे आहे. या मालिकेतही त्याने सातत्य दाखवून दिले नाही, मागील सामन्यात भारत भक्कम स्तिथीत असल्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्यात आले पण त्याला त्याचा फायदा करून घेता आला नाही.

जेव्हा महेंद्रसिंग धोनी नवीन होता आणि ७व्या क्रमांकावर खेळायचा तेव्हा देखील काही सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात यायची, असेच काहीसे जर हार्दिक बरोबर करण्यात आले तर.

२. अजिंक्य राहणेला संधी !

संघात दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केल्यामुले अजिंक्य राहणे आणि मनीष पांडेला या मालिकेत जास्त संधी मिळालेली नाही. केदार जाधवच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे शेवटच्या सामन्यात मनीष पांडेला संधी देण्यात आली होती, ज्याने मागील सामन्यात अर्धशतक करून त्या संधीच सोनं केले आहे.

रहाणे जरी वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आला तरी त्याला श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत वनडे संघात स्थान मिळाले नाही. पण या मालिकेत भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीने खूपच सुमार कामगिरी केली आहे त्यामुळे राहणेची जागा पाचव्या वनडेसाठी संघात निश्चित असेल.

३. फलंदाजीच्या मधल्या फळीत बद्दल !
चौथ्या वनडेमध्ये जेव्हा भारत सहज ४०० धावा पार करेल असे वाटत होते तेव्हाच भारताच्या फलंदाजीच्या मधल्या फळीने नांगी टाकली. धोनी आणि पांडेने डाव सावरला नसता तर भारताला ३७५चा टप्पाही गाठता आला नसता. या मालिकेत भारताच्या फलंदाजीच्या मधल्या फळीने सुमार कामगिरीचं केली आहे त्यामुळे भारताने मालिकेतील दुसरा सामना जवळ जवळ हरलाच होता.

शेवटच्या सामन्यात जर अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली तर कोहलीला त्याची ३ नंबरची जागा सोडावी लागेल. कारण राहणे मधल्या फळीत खेळू शकत नाही. मग रहाणे ३ नंबरला तर कोहली चार नंबरला आणि धोनी त्यानंतर असा फलंदाजीचा क्रम राहील.

४. तीन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश !

आतापर्यंत मिळालेल्या संधीमध्ये कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे त्याला आणखीन संधी मिळणे गरजेचे आहे, त्याच बरोबर अक्षर पटेलने हि सर्वाना आश्चर्यचकित करत चांगली गोलंदाजी केली आहे. या मालिकेत यजुर्वेंद्र चहलने म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही पण त्याला संधी देणे गरजेचे आहे.

भारतासाठी या मालिकेत तिसऱ्या फिरकी गोलंदाजांची कामगिरी केदार जाधवने केली आहे पण जर आता त्याच्या खराब फलंदाजी फॉर्ममुळे त्याला संघ बाहेर ठेवण्यात आले तर विराटला ३ फिरकी गोलंदाज खेळवण्याची चांगली संधी आहे.

कदाचित भारत भुवनेश्वर कुमारलाही विश्रांती देईल आणि वेगवान गोलंदाजी जबाबदारी जसप्रीत बुमरा आणि पंड्या यांच्या खांद्यावर असेल.

१. रोहित शर्माला विश्रांती !

असे करणे जरी वेडे पणाचे वाट असले तरी रोहितने मागील दोन सामन्यात जरी लागातार दोन शतके लागवलेली असेल तरी पुढील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी रोहित शर्मा हा भारतासाठी एक महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्यावर जास्त त्राण येऊ न देणे हे भारतीय संघ व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. रोहित आताच एका मोठ्या दुखापतीमधून बाहेर आला आहे आणि एवढा प्रवास करणे आणि सतत खेळत राहणे त्याच्यासाठी अवघड असणार आहे.
त्याहूनही महत्वाचं म्हणजे भारताला रोहितला विश्रांती दिल्यामुळे सलामीची असलेले पर्याय तपासून बघता येतील.