या ५ मोठ्या खेळाडूंनी दिल्या नाहीत विराट अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा

सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. त्यांचा ११ डिसेंबरला इटलीत कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.

याबद्दल त्यांना अनेक खेळाडूंनी तसेच चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात ए बी डिव्हिलियर्स, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

परंतु त्यांना काही मोठ्या खेळाडूंनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या नाहीत असेच हे ५ खेळाडू

एम एस धोनी: भारतीय संघातील अनुभवी खेळाडू असणारा धोनी सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय असतो. तो बऱ्याचदा अनेकांना शुभेच्छा देताना दिसत नाही. त्यामुळे धोनीने त्याचा संघसहकारी आणि कर्णधार असणाऱ्या विराटलाही शुभेच्छा दिल्या नाहीत यात आश्चर्य असण्यासारखे काही नाही.

विराट आणि धोनीमध्ये अनेकदा चांगले नाते असल्याचा प्रत्यय आला आहे . विराट नेहमी मैदानावर धोनीचा सल्ला घेताना दिसतो. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धोनीनेही विराटला शुभेच्छा द्याव्यात अशी अपेक्षा होती.

युवराज सिंग: विराट आणि युवराजमधील ब्रोमान्स सर्वांना माहीतच आहे. विराटही युवराजला मोठा भाऊ असल्याचे म्हणतो. परंतु युवराजने विराट आणि अनुष्काला त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर कोणत्याही शुभेच्छा दिल्या नसल्याने सर्वांना त्यांचे आश्चर्य वाटत आहे.

तसेच विराट अनुष्काचे लग्न झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी युवराजचा वाढदिवस होता, त्यालाही विराटने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याचे दिसून आले.

रवी शास्त्री: भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनींही विराटला सोशल मीडियावर कोणत्याही शुभेच्छा दिलेल्या नाहीत. शास्त्री नेहमी सोशल मीडियावर खेळाडूंचे कौतुक करताना दिसतात. त्यात शास्त्री आणि विराटचे चांगले असणारे नाते सर्वांना माहित आहे. शास्त्रींना प्रशिक्षक कारण्याआधीही विराटशी चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे शास्त्री हे देखील विराटला सोशल मेडियावर शुभेच्छा न देणाऱ्यांमध्ये मोठे नाव आहे.

वीरेंद्र सेहवाग: सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा सेहवाग त्याच्या ट्विट्समुळे कायमच चर्चेत असतो. तो त्याच्या वेगळ्याच शैलीत ट्विट करून सेलिब्रिटींना कधी शुभेच्छा, कौतुक तर कधी त्यांची खिल्ली उडवत असतो. त्यामुळेच सेहवाग विराट आणि अनुष्काला कशा शुभेच्छा देणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती.

सेहवाग आणि विराट हे दिल्ली तसेच भारतीय संघातून एकत्र खेळलेले आहेत. परंतु सेहवागने अशा कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा सोशल मीडिया वरून दिलेल्या नाही.

अनिल कुंबळे: विराट आणि अनुष्काला सोशल मीडियावरून शुभेच्छा न देणाऱ्या यादीतील हे एक मोठे नाव. पण हे नाव बहुतेक सगळ्यांना अपेक्षि असावे, कारण विराट आणि कुंबळे वाद सर्वांना माहित आहे. याच वादामुळे कुंबळेने प्रशिक्षकपद सोडले होते तेव्हापासून या दोघांमध्ये कोणताही संबंध दिसून आलेला नाही.

या मोठ्या खेळाडूंनी जरी विराट आणि अनुष्काला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या नसल्या तरी त्यांनी त्यांच्याशी वयक्तिक संपर्क साधून शुभेच्छा दिलेल्या असू शकतात.