कर्णधार बदल प्रकरण भोवले, संजू सॅमसनला होणार मोठी शिक्षा

केरळच्या क्रिकेपटूंना सचिन बेबी कर्णधार बदल प्रकरण चांगलेच भोवले आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने केरळ संघाचा कर्णधार सचिन बेबी विरोधात अहकार दाखवल्याबद्दल 5 खेळाडूंवर बंदी आणि 8 खेळांडूना दंड ठोठवण्यात आला आहे.

या दंड ठोठवलेल्या 8 खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन देखील आहे.

केरळ क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्रीजीत व्ही नायर म्हणाले, सर्व खेळाडूंबरोबर झालेल्या वैयक्तिक सुनावणी दरम्यान स्पष्ट झाले की खेळाडू संघटनेचे सुसंवाद, स्थिरता आणि हितसंबंधात धोक्यात घालण्यात सहभागी होते. तसेच त्यांनी कर्णधाराविरुद्ध स्वाक्षरी मोहिमही राबवली.

तसेच नायर म्हणाले, “त्यांचा कर्णधार आणि केरळ क्रिकेट असोसिएशनची बदनामी करण्याचा हेतू होता. त्यामुळे या गैरवर्तणाबद्दल एकमताने 5 खेळाडूंवर बंदी आणि 8 खेळाडूंवर दंडाचा निर्णय घेण्यात आला.

केरळ रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार सचिन बेबी विरुद्ध, त्याच्याच संघ सहकाऱ्यांनी बंड केले होते.

केरळ संघातील तेरा खेळाडूंनी केरळ क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून 2018-19 ची रणजी ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी नविन कर्णधार नियुक्त करण्याची मागणी केली होती.

या पत्रामध्ये केरळ संघाच्या तेरा खेळाडूंनी कर्णधार सचिन बेबीच्या, संघ सहकाऱ्यांशी असभ्य वर्तणूकीबद्दल तक्रार केली होती.

या 5 खेळाडूंवर 3 वनडे सामन्यांची बंदी घातली आहे. तसेच वनडे सामन्यांसाठी बीसीसीआय देत असलेली तीन दिवसांची मॅच फी दिली जाणार नाही. यात रायफी विनसेंट गॉमेझ, संदीप एस. वॉरियर, रोहन प्रेम, असीफ के आणि मोहम्मद अझरुद्दीन या 5 खेळाडूंचा समावेश आहे.

तर वनडे सामन्यांसाठी बीसीसीआय देत असलेली तीन दिवसांची मॅच फीचा दंड ठोठवण्यात आलेल्या 8 खेळाडूंमध्ये अभिषेक मोहन, अक्षय केसी, फाबीद फारुक अहमद, निधीश एमडी, संजू सॅमसन, सलमान निझार, सिजोमन जोसेफ आणि व्हिए जगदीश यांचा समावेश आहे.

खेळाडूंनी त्यांच्या दंडाची रक्कम मुख्यमंत्री यांच्या निवारक मदत निधीला 15 सप्टेंबरपर्यंत सुपुर्त करायची आहे आणि त्याचा पुरावा सादर करायचा आहे.

त्याचप्रमाणे केरळने भविष्यात खेळाडूंना अशा गोष्टी न करण्याची ताकीद देण्याचा आणि पुन्हा अशा गोष्टी घडल्या तर त्यावर कारवाई केली जाण्याचा निर्णय घेतला आहे.

काय होते सचिन बेबी प्रकरण- तो एक स्वार्थी, गर्विष्ठ आणि हुकूमशहा आहे, आम्हाला तो कर्णधार म्हणुन नकोच

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्सच्या बक्षीस रकमेतून घराची करणार डागडुजी- द्युती चंद

गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच दिग्गज ‘अॅलिस्टर कूक’बरोबर असे घडले

 वॉचमनच्या मुलाची झाली आशिया कपसाठी टीम इंडियात निवड

 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद