भारतीय संघ फिफा विश्वचषकाबाहेर फेकला जाण्याची ५ कारणे

फिफा अंडर १७ विश्वचषक भारतात होणार याची जेव्हा फिफाकडून घोषणा झाली त्यावेळपासून भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये फिफा विश्वचषकाबद्दल खूप आकर्षण निर्माण झाले. त्यानंतर भारतीय संघाची विश्वचषकासाठी बांधणी सुरु झाली. भारतीय संघ विदेशात जाऊन खेळू लागला. भारतीय संघ विदेशात सामने जिंकत आहे याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या आणि विश्वचषकात भारतीय संघ कशी कामगिरी करेल यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले.

फिफा विश्वचषक सुरु झाला. अनेक भारतीय क्रीडाप्रेमींच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय संघ अमेरिका संघाविरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात आला. पहिला सामना भारतीय संघाने गमावला. त्यानंतर भारतीय संघ दुसरा सामना कोलंबिया विरुद्ध खेळला. हा सामना देखील भारताने गमावला. हा सामना भारतासाठी अनेक बाबींनी महत्वाचा ठरला. या सामन्यात भारताचा फिफा विश्वचषकातील पहिला आणि एकमेव गोल नोंदवला गेला.

भारताचा तिसरा सामना घाना विरुद्ध झाला आणि त्यात देखील भारताला ४-० असा पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला. त्यामुळे स्पर्धेतील भारतीय संघाच्या पराभवाचे करणे शोधली जात आहेत. भारतीय संघाच्या पराभवाची करणे शोधण्याचा आढावा.

#१ घरच्या मैदानावरील स्वागताने भारावलेले खेळाडू –
भारताने आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात अमेरिका संघाविरुद्धच्या सामन्याने केली. या सामन्यात भारतीय संघाला खूप समर्थक लागले. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात हजार झाले. परंतु असा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याने भारतीय खेळाडूंवर दडपण आले. सामन्यात कित्येकदा त्यांची पासिंग बरोबर होत नव्हती. बॉलवर ताबा ठेवण्यात भारतीय संघ कमी पडत होता.

फिफासारख्या मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणे आणि तेही घरच्या मैदानावर त्यामुळे भारतीय संघ थोडा भावनिक झाला आणि सामन्यात खेळताना त्यांना याचे दडपण आले. पहिला सामना भारतीय संघाने गमावला. उर्वरित दोन सामन्यात या गोष्टीचे दडपण भारतीय संघावर आले नाही तरीदेखील पहिल्या सामन्यातील मोठ्या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेबाहेर फेकला जाणार हे निश्चित झाले होते.

#२ सर्वात कठीण गटात भारताचा समावेश –
भारताच्या स्पर्धेतील आव्हान लवकर संपुष्टात येण्याचे हे खूप मोठे कारण आहे. भारतासोबत गटामध्ये दोन वेळेचे विजेते घाना, अमेरिका आणि कोलंबिया हे होते. घाना दोन वेळचे विजेते, अमेरिका संघ सध्या सर्वोत्तम युवा संघापैकी एक तर कोलंबिया सर्वोत्तम कौशल्यपूर्ण खेळाडूंचा संघ आहे. त्यामुळे या तगड्या आणि अनुभवी गटात भारताचे असणे हे देखील स्पर्धेत लवकर गाशा गुंडाळावा लागण्याचे कारण आहे.

#३ शाररिक क्षमता –
भारतीय खेळाडूंची शाररिक क्षमता ही विदेशी खेळाडूंच्या तुलनेत कमी पडते आहे. याचे उत्तम उदाहरण हे घाना विरुद्धचा सामना आहे. घानाच्या तगड्या डिफेंडर्स आणि मिडफिल्डर्सनी भारतीय संघाला वरचढ होऊ दिले नाही. त्यांनी त्यांच्या शाररीक क्षमतांचा उत्तम उपयोग करत भारताचा करा किंवा मारा सामन्यात ४-० असा परभव केला.

भारतीय संघाचे प्रशिक्षक लुईस मॅटोस यांना देखील भारतीक संघाची शारीरिक क्षमता हीच एकमेव कमजोरी वाटत आहे. मॅटोस म्हणाले होते,”तुम्हाला जर उत्तम जिम्नॅस्ट बनायचे असेल तर तुम्ही खूप उंच असून चालत नाही आणि जर तुम्हाला उत्तम बास्केटबॉलपटू बनायचे असेल तर १६० सेंटिमीटर असून चालत नाही. त्यामुळे काही वेळी उंची आणि अकरा खूप महत्वाचा असतो.”

#४ गोल करण्यात आलेले अपयश –
भारतीय संघाने तीन सामन्यात फक्त एक गोल केला आहे. असे नाही की भारताला गोल करण्याच्या संधी मिळाल्या नाहीत . भारतीय संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या परंतु त्यांचा लाभ घेण्यात भारतीय संघ अपयशी ठरला.

भारतीय संघाची डिफेन्सिव्ह खेळ करण्याची रणनीती असली तरी भारतीय संघाला अमेरिका आणि कोलंबिया विरुद्धच्या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी दडवल्या. कोमल थाटल याला पहिल्या सामन्यानंतर संघात न निवडणे, त्याच बरोबर अभिजित सरकार आणि अनिकेत जाधव यांना गोल करण्यात आलेले अपयश हे देखील भारतीय संघाच्या पराभवाची करणे आहेत.

#५ अनुभवाची कमतरता-
भारतीय संघ फिफासारख्या मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा खेळत होता. भारतीय संघात खूप प्रतिभावान खेळाडू आहेत परंतु त्यांना स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्याचा अनुभव नाही. या अनुभवाच्या कमतरता पहिल्या सामन्यात दिसली. अमेरिकेला पेनल्टी मिळाली आणि त्यांनी गोलचे खाते उघडले. कोलंबिया विरुद्ध सामन्यात देखील अनुभवाची कमतरता दिसली.

युवा खेळाडूंना या स्पर्धेतील सामन्यांमधून खूप मोठा अनुभव मिळाला असला तरी भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. जास्तीत जास्त स्पर्धात्मक फुटबॉल खेळून या क्षेत्रात भारतीय संघ प्रगती करू शकतो आणि भविष्यात उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा करू.