कोलकाता नाईट रायडर्ससाठी कोण ठरणावर हुकमी एक्का

गंभीरच्या नेतृत्वाखाली मागील काही मोसमात कोलकाता संघाने उत्तम कामगिरी केली आहे, तशीच काहीशी कामगिरी करून कोलकाता संघाने या आयपीएलमध्ये अंतिम ४ मध्ये स्थान मिळवून करून दाखवली आहे. अंकतालिकेत कोलकत्याचा संघ तिसऱ्या स्थानी होता .त्यांचा पहिल्या एलिमिनटर सामना अंकतालिकेत चोथ्या स्थानी असलेल्या सॅन रायझर्स हेंद्रबाद संघाबरोबर झाला. या सामन्यात प्रथम त्याच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आणि नंतर पाऊसाची साथ लाभल्यामुळे त्यानी हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. या मोसमात कर्णधार गंभीर हा उत्तम लयमध्ये आहे आणि जर कोलकत्याला या मुंबई विरुद्धच्या दुसऱ्या एलिमिनटरमध्ये विजय मिळवायचा असेल तर गंभीरसह बाकी खेळाडूंनाही चांगली कामगिरी करणं गरजेचे आहे.

पाहुयात कोणते खेळाडू ठरतील कोलकात्तासाठी हुक्कमी एक्के.

 
५. उमेश यादव
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा कोलकत्यासाठी एक महत्वाचा खेळाडू बनला आहे . त्याने पॉवरप्लेमध्ये भेदक मारा केला आहे. त्याने या मोसमात १३ सामन्यात ८ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या आहेत . त्याच्या वेगवान बॉऊन्सर्सच कोणत्याच फलंदाजाकडे उत्तर नाहीये असे दिसून येते. कोलकत्याला अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल तर उमेश यादवने चांगली खेळी करणे गरजेचे आहे.

 
४. रॉबिन उत्थापा 
उत्थापाने या वर्षी कोलकात्याकडून खेळताना उत्तम फलंदाजी केली आहे . त्याने १२ सामन्यात ३२ च्या सरासरीने ३८७ धाव काढल्या आहे , ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. आधी सलामीला येणाऱ्या उत्थापाला नारायणच्या पॉवरप्लेमधील उत्तम फटकेबाजीमुळे मध्यम फळीमध्ये फलंदाजीला यावे लागले , त्यामुळे त्याचा काहीसा सूर हरपला आहे असे दसून येते.

 

३.सुनील नारायण 
सुनील नारायण हा आता एक अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आला आहे.त्याने या वर्षी आधी गंभीरबरोबर व नंतर लिनबरोबर सलामीला येऊन २१४ धाव ठोकल्या आहेत . त्याचा स्ट्राईक रेट हि १८० चा आहे . बिग बॅश या ऑस्ट्रेलियातील टी२० स्पर्धेत त्याने अशीच आपल्या बॅटची जादू दाखवली होती. जर बेंगलोरच्या लहान मैदानावर कोलकात्याला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर सुनील नारायणच्या फटकेबाजीवची कोलकत्याला गरज आहे.

 

२. क्रिस लिन
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज आणि पॉवर हिटर म्हणून ओळखला जाणारा क्रिस लिन हा या वर्षी काही भलत्याच फॉर्ममध्ये आहे. बिग बॅश लीगचा फॉर्म त्याने आयपीलमध्ये हि कायम राखला आहे. त्याने ६ सामन्यात ६०च्या सरासरीने आणि १८० च्या स्ट्राईक रेटने २९१ धावा केल्या आहेत ज्यात ३ अर्ध शतके सामील आहेत.

 

१. गौतम गंभीर
गौतम गंभीरसाठी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे “कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट “. त्याने आता पर्यंतच्या १५ सामन्यात ४८६ धावा केल्या आहेत . तसेच त्याची सरासरी ४४ ची असून स्ट्राईक रेट १३० चा आहे . त्याने या मोसमात ४ अर्धशतकेही ठोकली आहेत . फक्त फलंदाजीचा नाही तर त्याने आपल्या नेतृत्वानेही सर्वांना प्रभावित केले आहे.

 

जर कोलकात्याला आपला तिसऱ्या आयपीएल अंतिम सामना खेळायचा असेल तर या खेळाडूंवर त्याच्या संघाच्या खूप अपेक्षा असतील.