हे पाच खेळाडू नेऊ शकतात मुंबई इंडियन्सला अंतिम सामन्यात

मुंबई इंडियन्सने जरी २०१७च्या आयपीएल गुंणतालिकेत अव्वल स्थान मिळवले तरी स्मिथच्या नेतृत्वखाली रायजिंग पुणे सुपरजायंट्सने पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईच्या संघाचा २० धावांनी त्याच्याच घरच्या मैदानावर दारुण पराभव केला आहे. या मोसमात मुंबईच्या पुण्याबरोबर झालेल्या तिन्ही सामन्यात पुण्याने मुंबईच्या संघाला पराभूत केले. तरी ही मुंबईकडे दुसऱ्या एलिमिनटरमध्ये चांगला खेळ करत कोलकाता नाईट रायडर्सला हरवून अंतिम सामन्यात धडक मारण्याची संधी आहे. मुंबईकडे रोहित शर्मा ,किरेन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या सारखे धडाकेबाज खेळाडू आहेच तसेच मिचेल मॅकलेनघन आणि जसप्रीत बुमराह सारखे वेगवान गोलंदाज ही आहेत.

पाहुयात कोणते खेळाडू मुंबईला चांगली कामगिरी करून अंतिम सामन्यात नेऊ शकतात .

 

५. लसिथ मलिंगा.
या वर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळताना मलिंगाने जरी १० सामन्यात फक्त १०च बळी घेतले आले तरी मलिंगाला कमी लेखण्याची चूक कोलकता नाईट रायडर्स करणार नाही . यॉर्कर किंग म्हणून ओळखला जाणारा हा श्रीलंकेचा खेळाडू आयपीलच्या पहिल्या मोसमपासून मुंबईकडून खेळात आहे . मुंबईकडून उत्कृष्ट कामगिरी करताना त्याने आयपीलमध्ये सर्वाधिक(१५३) बळी घेतले आहेत .

४. जसप्रीत बुमराह.
भारताचा नावेदित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहा मुंबई इंडिअन्सच्या गोलंदाजीचा एक अविभाज्य घटक बनला आहे . मलिंगाबरोबर खेळता खेळता त्यानेही मलिंगासारखे यष्टीभेदी यॉर्कर्सवर आपली पकड बसवली आहे. त्याने या मोसमात गोलंदाजी करताना ८ च्या सरासरीने १५ बळी घेतले आहेत. या मोसमात गुजरात लायन्सबरोबर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये त्याने मॅकेलम आणि फिंच सारख्या आंतररराष्ट्रीय टी२० सामन्यात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांनाही सुरेख गोलंदाजी करत रोखून ठेवले.

 

३. पार्थिव पटेल.
पोलार्ड , रोहित शर्मा आणि सिमन्स सारखे धडाकेबाज फलंदाज संघात असूनही पार्थिव पटेलने मुंबई कडून खेळताना या मोसमात सर्वाधिक म्हणजेच १४ सामन्यात ३७७ धावा खेळ्या आहेत. सलामीला येऊन त्याने मुंबईला नेहमीच चांगली सुरवात करून दिली आहे. या मोसमात त्याने २ अर्धशतकेही ठोकली आहेत.

 

२. हार्दिक पंड्या.
भारताचा उभारता अष्ठपैलू खेळाडू आणि मुंबई इंडिअन्सचाच प्रॉडक्ट हार्दिक पंड्या याने या वर्षी मुंबईकडून खेळताना काही उत्तम कामगिरी केल्या आहेत. खालच्या फळीमध्ये फलंदाजी करताना शेवटच्या काही षटकात त्याने खूप सुरेख फलंदाजी केली आहे. त्याचा स्ट्राइक रेट १६० च्या जवळपासचा आहे आणि या मुंबई संघात सर्वाधिक आहे. तसेच गोलंदाजी करताना त्याने १५ सामन्यात ६ बळीही घेतले आहेत.

 

१. किरेन पोलार्ड.
१५ सामन्यात ३० च्या सरासरीने ३६९ धावा , त्यात ३ सामने जिंकून देणारी अर्धशतके अशी कामगिरी या वर्षी या वेस्ट इइंडिएसच्या खेळाडूने केली आहे. त्याचा
अष्ठपैलू खेळ मुंबईसाठी महत्वपूर्ण ठरला आहे. पोलार्डने या वर्षी मुंबईकडून जास्त गोलंदाजी केलेली नाही पण काही सुरेख झले घेऊन त्याने त्याचा ऑलराऊंड खेळ दाखवून दिला आहे.

आता या खेळाडूंच्या प्रदर्शनावरूनच ठरणार आहे कि क्रिकेट रसिकांना मुंबई पुणे अंतिम सामना भगयला मिळणार कि नाही?