अजित वाडेकरांबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही काळापासून अजित वाडेकर आजारी होते.

अशा या भारताच्या दिग्गज माजी कर्णधाराबद्दल ह्या माहित नसलेल्या ५ गोष्टी-

१. वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा परदेशात कसोटी विजय मिळवला होता. १९७१ मध्ये भारताने इंग्लंड (१-०) आणि विंडीज (१-०) या देशात कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने आजपर्यंत इंग्लंडमध्ये केवळ ३ कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

२. कोणताही कसोटी सामना जो संघ पराभूत होईल अशी परिस्थिती असताना तो अनिर्णित राखण्याची क्षमता वाडेकर यांच्यात होती. म्हणुन समकालिन क्रिकेटरपेक्षा ते बरेच वेगळे होते.

३. सुनिल गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, एस वेंगकटराघवन आणि बिशनसिंग बेदींसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी कर्णधार अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

४. अजित वाडेकर हे भारताचे पहिले वनडे (मर्यादीत षटकांचे )कर्णधार होते.

५. वाडेकर कर्णधार असाताना भारतीय संघ २ वनडे सामने खेळला. दुर्दैवाने या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

६. वाडेकर हे केवळ तिसरे असे भारतीय खेळाडू होते ज्यांनी कर्णधार, टीम मॅनेजर आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणुन काम पाहिले होते. अन्य दोन खेळाडूंमध्ये लाला अमरनाथ आणि चंदु बोर्डे यांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जेव्हा स्टुअर्ट ब्रॉडचे वडीलच घेतात त्याची हॅट्रिकची संधी हिरावुन

हरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी

जेव्हा आयसीसीच्या क्रमवारीत सर्वच खेळाडू येतात अव्वल स्थानी