या विक्रमासह कोहली सामील झाला युवी, धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत 

मुंबई । आघडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत जात असताना एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आज २००व्या वनडेत ५० धावा करून एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. 

कारकिर्दीतील २००व्या वनडेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा कोहली केवळ ४था भारतीय खेळाडू बनला आहे. आजपर्यंत भारताकडून १४ खेळाडू २००  वनडे खेळले आहेत. त्यात केवळ एमएस धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांना ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. 

विशेष म्हणजे भारतीय कर्णधाराने एका वर्षात १२ वेळा वनडेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोहलीने मोहम्मद अझरुद्दीन (११) आणि एमएस धोनी यांचाही विक्रम मोडला आहे. 

२००व्या वनडेत अर्धशतकी खेळी करणारे भारतीय खेळाडू 

७६ युवराज सिंग
५८* एमएस धोनी
५२ सुरेश रैना
५४* विराट कोहली

भारतीय कर्णधाराने एका वर्षात केलेल्या सर्वाधिक ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी 

१२ विराट कोहली
११ मोहम्मद अझरुद्दीन
११ एमएस धोनी