प्रो कबड्डी: चढाईत ५०० गुण पूर्ण करणारा काशीलिंग अडके पाचवा खेळाडू, तर महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू

-अनिल भोईर

चेन्नई। प्रो कबड्डी सीजन ६ च्या चौथ्या दिवशी तामिळ विरुद्ध बेंगळुरू सामन्यात बेंगळुरू बुल्स संघात खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या काशीलिंग अडके एक मोठा विक्रम केला.

बेंगळुरू बुल्सने सीजन ६ मधील आपला सामना खेळला. पहिल्याच सामन्यात काशीलिंगला एक मोठा विक्रम करण्याची संधी होती. प्रो कबड्डीमध्ये चढाईत ४९४ गुण मिळवणाऱ्या काशीला ५०० गुणांचा आकडा गाठण्यासाठी ६ गुणांची आवश्यकता होती. चढाईत ६ गुण मिळवत काशीलिंगने केवळ चढाईत ५०० गुण पूर्ण करणाच्या पराक्रम केला. असा पराक्रम करणारा महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू ठरला.

प्रो कबड्डीच्या इतिहासात काशीलिंग अडकेने आतापर्यंत ७३ सामन्यात ५०३ रेड पॉईंट्स सह एकूण ५३७ गुण मिळवले आहेत. काळ झालेल्या सामन्यात केवळ चढाईत ५०० वा गुण मिळवणारा काशीलिंग हा प्रो कबड्डीतील पाचवा खेळाडू ठरला. प्रो कबड्डीत ५०० गुण मिळवणारा महाराष्ट्राचा पहिला खेळाडू होण्याचा मान काशीलिंग अडकेने मिळवला.

प्रो कबड्डीच्या इतिहासात आतापर्यंत केवळ पाच खेळाडूंनी चढाईत ५०० गुणचा पल्ला पार केला आहे. असा पराक्रम प्रथम राहुल चौधरीने केला होता. त्यानंतर प्रदीप नरवाल, अजय ठाकूर, दीपक हुडाने चढाईत ५०० गुण पल्ला पार केला आहे.

प्रो कबड्डीमध्ये केवळ चढाईत ५०० गुण मिळवणारे खेळाडू:
१) राहुल चौधरी – ८० सामने, ६७५ गुण
२) प्रदिप नरवाल – ६५ सामने, ६३६ गुण
३) अजय ठाकूर – ८४ सामने, ५८२ गुण
४) दीपक हुडा – ८२ सामने, ५१६ गुण
५) काशीलिंग अडके – ७३ सामने, ५०३ गुण

महत्वाच्या बातम्या-