प्रो कबड्डीत असा पराक्रम करणारा रिशांक देवडिगा ठरला महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू

-अनिल भोईर

चेन्नई | काल प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा चेन्नई लेगच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सामना युपी योद्धा विरुद्ध पाटणा पायर्ट्स यांच्यात झाला. यासामन्या दरम्यान युपी योद्धाचा कर्णधार रिशांक देवडिगाने एक खास विक्रम केला.

युपी योद्धचा कर्णधार रिशांकला ५०० गुण पूर्ण करण्यासाठी ५ गुणाची आवश्यकता होती. काल झालेल्या पाटणा विरुद्धच्या सामन्यात ८ गुण मिळवत रिशांकने प्रो कबड्डी इतिहासात ५०० गुण पूर्ण केले. ५०० गुण पूर्ण करणारा रिशांक देवडिगा सातवा खेळाडू ठरला.

पाटणा विरुद्ध त्याने कालच्या सामन्यात एकूण ०८ गुण मिळवले. कालच्या सामन्याआधी रिशांकने एकूण ४९५ गुण होते. कालच्या सामन्यात ५ गुण मिळवताच रिशांकने प्रो कबड्डीच्या इतिहासात ५०० गुण मिळवण्याचा पराक्रम केला. आतापर्यत त्याचे ८२ सामन्यात चढाईत ४६२ तर पकडीत ४१ गुणसह एकूण ५०३ गुण झाले आहेत. तसेच प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो ५०३ गुणांसह ७ व्या स्थानावर आहे.

प्रो कबड्डीच्या इतिहासात ५०० गुण पूर्ण करणारा रिशांक देवडिगा हा केवळ दुसरा महाराष्ट्राचा खेळाडू ठरला आहे. याआधी असा विक्रम महाराष्ट्राच्या काशीलिंग अडकेने केला आहे.

प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळवणारे महाराष्ट्राचे खेळाडू:
१) काशीलिंग अडके – ५३७ गुण, ७३ सामने
२) रिशांक देवडिगा – ५०३ गुण, ८२ सामने
३) गिरीश इरणक – १८७ गुण, ७१ सामने
४) निलेश साळुंखे – १८२ गुण, ४४ सामने
५) नितीन मदने – १७३ गुण, ३७ सामने

महत्वाच्या बातम्या-