प्रो कबड्डीमध्ये मोठा विक्रम, राहुल चौधरीचे रेडींगमध्ये ५०० गुण

प्रो कबड्डी इतिहासात सर्वात यशस्वी रेडर कोण विचारले, तर कबड्डी जाणणारा प्रत्येक जण अर्थातच राहुल चौधरीचे आणि त्याला परत विचारले की त्याचे रेडेइंगमध्ये कालपर्यंत किती गुण होते तर तो एकदम बरोबर आकडा सांगेन की ४९९ रेडींग गूण. कालचा दिवस त्याचा नव्हता. आज सारे कबड्डी चाहते फक्त राहुलचे रेडींगमधील ५००वा गुण पाहण्यासाठी आले होते.

आज तेलगू टायटन्स आणि बेंगलूरु बुल्सचा सामना सुरु झाला आणि राहुल सामन्याची पहिली रेड केली पण आजची पहिली रेडही एम्प्टी रेड केली. परत दुसरी रेड करण्यासाठीही तो जेव्हा केली तेव्हा त्याला बेंगळुरू बुल्सच्या खेळाडूने टॅकल करण्याचा प्रयन्त केला परंतु ते राहुलला ते टच लाईनपर्यंत जाण्यावाचून रोखू शकले नाहीत आणि राहुलला एक गुण मिळाला. या गुणांसह राहुल प्रो कबडीच्या इतिहासातील पहिला खेळाडू बनला ज्याने फक्त रेडींगमध्ये ५०० गुण मिळवले आहेत.

रेडींगच्या गुणांमध्ये राहुल पहिल्या क्रमांकावर आहे तर त्यापाठोपाठ यु मुंबाचे रेडर अनुपकुमार आणि काशीलिंग अडके ३८८ गुणांसह संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहेत.